जागतिक महिला दिनानिमित्त शेरसुहास मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

बारामती दि.८: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शेरसुहास मित्र मंडळाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करत आरोग्य शिबिराचे उदघाटन झाले.यावेळी डॉ.अंजली खाडे,डॉ.रेश्मा सरतापे आणि रसिका अहिवळे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या आरोग्य शिबिरामध्ये बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ.सौ.अंजली खाडे (एम.डी.मेडिसिन) आणि डॉ.रेश्मा सरतापे (बी.ए.एम.एस) यांनी उपस्थित महिलांची तपासणी करून आरोग्याच्यादृष्टीने घ्यावयाची काळजी आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.निलम अहिवळे,सूत्रसंचालन प्रा.सेजल अहिवळे तर आभारप्रदर्शन प्रा.शिल्पा घोडके यांनी केले.
दरम्यान,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासंती अहिवळे,प्रगती अहिवळे,पूजा लोंढे,प्रतिज्ञा चव्हाण,सारिका गव्हाळे,अर्चना चौधरी,सौरवी अहिवळे, राजश्री अहिवळे,भावना अहिवळे यांनी परिश्रम घेतेले.तर गणेश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट,समर्थ लॅब्रॉटरी,जी.एन.एस लॅब्रॉटरी,घोडके रुग्णवाहिका यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक