पुण्यातील विषारी दारुकांड प्रकरणामुळे बारामती शहरात पोलिस व उत्पादन शुल्क अधिकार्यांची धडक कारवाई ! वाईन,बियर शाॅपवर सुद्धा छापा !

महाराज्य टाईम्स:
    पुणे शहरात विषारी दारु पिल्यामुळे २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सक्त चौकशी व कारवाईचे आदेश दिल्यामुळे अनेक पोलिस व उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना निष्काळजीपणा मुळे सेवेतून निलंबित करण्यात आले होते. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे बारामती शहरात सुध्दा पोलिस व उत्पादन शुल्क अधिकार्यांनी धडक छापा टाकून अनेक ठिकाणी अवैध दारु बनवण्यासाठी वापरली जाणारी रसायने व इतर साहित्य नष्ट केले आहे. प्रामुख्याने आमराई परिसरात शाळेजवळ हि कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


बारामती शहरात अचानक छापा व कारवाई :

     आज बारामती शहरात पोलिस व उत्पादन शुल्क अधिकार्यांनी अचानक छापा टाकून बेकायदेशीरपणे दारु बनवणारे व विकणार्यांवर धाडसी कारवाई केल्यामुळे अनेक ठिकाणी संबधित लोकांना धडकी भरल्याचे दिसून आले. अनेक वाईन शाॅप व बियर शाॅपी यांना कायद्यानुसार दारुची फक्त रिटेल विक्री करण्याची परवानगी आहे. परंतू जास्त फायद्याच्या स्वार्थासाठी दारु पिणार्यांना तेथेच स्नॅक्स व ग्लास देऊन पिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे असे पोलिसांना दिसून आले.
     पोलिसांनी संबंधित वाईन व बियर शाॅप मालकांना सक्त सुचना देऊन कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दुकानदारांची अचानक पडलेल्या छाप्यामुळे तारांबळ उडालेली दिसून आली आहे.


वाईन व बियर शाॅप मालकच करत होते पिणार्यांची सोय-

     साठे नगर कसबा या ठिकाणी नितीन वाईन शॉप समोर काही दारू पिणार वाईन शॉप मधूनच दारू घेऊन पीत असतं या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने घटनास्थळी येऊन पोलिसांची कारवाई झाली.
   



      या कारवाई मध्ये शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्यासह उत्पादन शुल्कचे निरिक्षक सागर साबळे, जाधव, भंडारी, पोलीस हवालदार पवार, शिंदे,पोलीस कॉ. देवकाते, शिंदे, घाटे, उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक