हिंदु धर्माची आस्था असलेल्या गो-मातेला "राष्ट्रीय पशू" घोषित करा! गो-हत्या तिव्र बंदी करा - मुस्लिम समाजाची ठोस मागणी


गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी
बारामती, दि. २६ मे
(महाराज्य टाईम्स)

बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने आज प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती शहर पोलीस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध व गोसंरक्षण संदर्भातील कायद्यांना बारामतीतील मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आमच्या हिंदू समाज बांधवांच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय असलेल्या गोमातेला “राष्ट्रीय पशू” घोषित करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी लक्षात घेऊन निरुपयोगी व पालन अशक्य झालेल्या गायींसाठी आर्थिक मोबदला देणे, गोपालनासाठी प्रतिदिन अनुदान सुरू करणे, गोशाळांची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारणे, तसेच गोसंरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या व मॉब लिंचिंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

गोवंश संरक्षणासोबतच कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्ये जपली जावीत, अशी भूमिका यावेळी बारामती Muslim समाजाच्या वतीने मांडण्यात आली.

सदर निवेदनावर उपस्थित या लोकांनी सह्या केल्या - 

मुनीर दादाभाई तांबोळी, अजिज जाफर सय्यद, पीर मोहम्मद फतेह मोहम्मद शेख, कासम हरून कुरेशी, एजाज बशीर शेख ,सलमान मन्सूर शेख, रियाज सुलतान सय्यद, लतीफ छबूलाल शेख, मोइन युनुस बागवान, फैयाज इलाही शेख, मन्सूर कमाल शेख, आक्रम अजिज बागवान, इब्राहिम आजिज बागवान, आरिफ दिलावर मुजावर, अर्सलान जाकिर बागवान, आसिफ चांद भाई शेख, दस्तगीर रहमान शेख, अजहर युनुस शेख , तालीब कुरेशी, खाजा कुरेशी, ए ,के, कुरेशी, रियाज शौकत शेख,वसीम नजीर कुरेशी ,कलीम कुरेशी बसपा पार्टीचे जेष्ठ नेते काळुरामजी चौधरी, विजय जगताप बीएसपी जिल्हा उपाध्यक्ष, संजय सदाशिव वाघमारे आरपीआय तालुकाध्यक्ष बारामती. सामाजिक कार्यकर्ते चिऊशेठ जंजिरे, अफरोज बाबुलाल मुजावर, तोसीफ मजीद बागवान, चिऊ - शेठ जंजिरे , जैद मुजफ्फर बागवान ,मुन्नाभाई (फुल अँड फायनल) बागवान, आय्याज शेख पत्रकार  तैनुर शफीक शेख, मन्सूर शेख, मोईन बागवान, मोहसीन शेख व तसेच  इतर मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक