पोलिस उपनिरिक्षक व महिला कर्मचार्यावर तरुणाची अरेरावी व दमबाजी करत झाला फरार ! बारामतीत कायद्याचा धाक राहिला नाहि?

महाराज्य टाईम्स:
      बारामती शहरात तिनहत्ती चौक(तिरंगा चौक) येथे वाहतुक बंदोबस्तावेळी उपनिरिक्षक व महिला कर्मचार्याला अरेरावी करुन एक दुचाकी चालक फरार झाला. पोलिस फौजफाटा असताना असे प्रकार घडत असतील तर कायद्याचा धाक बारामतीत आहे का नाही असा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे.
     १२ मे रोजी संध्याकाळी ७ वा सुमारास तिरंगा चौक बारामती येथे नाकाबंदी मोहीम चालु असताना यूनिकॉर्न दुचाकी गाडी नं MH42 BV 8805 ही वरील अनोळखी चालक याने वाहतुक नियंत्रण करणारा सुरक्षा रक्षक जवान नामे केशव रमेश मोरे र.नं.4997 यास शिवीगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण करीत असताना वाहतूक पोलिस कर्मचारी तेथे पोहचले. महिला कर्मचारी यांनी त्यास वाहतुकीचे नियमभंग केल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिस कर्मचारी यांना अरेरावीची दमबाजी केली. त्यानंतर उपनिरिक्षक सुभाष काळे यांनी जाब विचारताच त्यांना सुद्धा अरे कारे ची भाषा वापरून अरेरावी करत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणुन गर्दीचा फायदा घेवुन अधांरात पळुन गेला आहे. 




      उपनिरिक्षक सुभाष काळे वाहतुक शाखा यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 182/2026 भारतीय न्याय संहीता- 132,115(2), 351(2) (3) प्रमाणे अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. दाखल अंमलदार म.पो. हवा. घुले ब.नं 1269, तपासी अंमलदार पो. हवा. जाधव ब.नं 74

    कायद्याच्या रक्षकांवर जर असे प्रसंग येत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालवताना अशा घटना घडल्यास कदाचित गुंडगिरी करणार्याकडुन मारहाणी व जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. पोलिसांना तर सर्व कायदेशीर यंत्रणा हातात असते पण नागरिकांनी काय करायचे हा एक गंभीर विषय आहे. सदर प्रकरणात पोलिस कशी व किती गंभीरपणे कारवाई करतील हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.जर कठोर कारवाई झाली तर समाजात पोलिसांबद्दल धाक राहू शकेल. अन्यथा बारामती नागरिकांची सुरक्षा व वाहतूक व्यवस्था रामभरोसे का? हा गंभिर प्रश्न नागरिकांना पडला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक