माळेगाव पोलिसांची धाडसी कारवाई! गोरक्षकाच्या मदतीने वाचवले खिलारी गाईंचे प्राण !!

महाराज्य टाईम्स:
बारामतीत मेडद हद्दिमध्ये खिलारी देशी गाईंची कत्तल करण्याच्या हेतूने डांबून ठेवण्यात आले होते. गोरक्षांच्या माहितीवरून माळेगाव ता.बारामती पोलिसांनी धाडसी कारवाई करुन गाईंना सोडवून प्राण वाचवले आहेत.

घटना काय आहे-
     मौजे नेपतवळण, ता.बारामती, जि.पुणे गावचे हद्दित अक्षय उर्फ बबलु विजय बागाव, रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे याने त्याचे मालकीचे जागेतील पत्राशेड बिलाल कुरेशी, रा.बारामती यास गोवंश जनावरांची अवैधपणे कत्तल करणेसाठी जागा उपलब्ध करून दिली असुन सदर शेडमध्ये बापु कोंडीबा ठोंबरे, रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे हा रक्ताचे डाग साफसफाई करताना व पुरावा नष्ट करत असताना मिळुन आला आहे. तसेच सदर शेडचे बाहेर वरील वर्णनाचे एकुण 3 खिलार देशी कुपोशीत गायी कत्तलीचे उद्देशाने चारा-पाण्याची सोय न करता दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत मिळुन आल्या असुन सदर पत्राशेडमध्ये गोवंश मांसाचा तुकडा तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे इत्यादी साहीत्य मिळुन आले आहे.
    या गंभीर प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 1) बिलाल कुरेशी(पुर्ण नाव माहीत नाही, रा.बारामती, ता.बारामती, जि.पुणे, 2) अक्षय उर्फ बबलु विजय बागाव, रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे व 3) बापु कोंडीबा ठोंबरे, रा.मेडद, ता.बारामती, जि.पुणे यांचेविरूद्ध माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं  कलम 121/2026 भारतीय न्याय संहीता कायदा 2023 चे कलम 238,325,3(5)  , प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि 1960 चे कलम 11(1)(H).11(1)(I), महा प्राणी संरक्षण अधि 1976 चे कलम 5,5(क)(ब),9,11, अन्वये 
गुन्हा दाखल केला आहे.
       फिर्यादी - वैभव सुनिल थोरात (गोरक्षक) वय 26 वर्षे  रा बारामती हॉस्पीटल, बारामती यांनी त्यांचे सहकारी वेदांत शिक्षित, प्रणय वाघमारे, किरण कांबळे, आदित्य भोसले, विराज अवधुते यांनी धाडसाने माहिती घेऊन सदर प्रकार पोलिसांना कळवून कारवाई केली आहे.
     सदर कारवाई मध्ये मिळाला माल-1) 20,000/-रू. एक पांढ-या रंगाची खिलार जातीची देशी गाय वय अंदाजे 5 ते 6 वर्षे असुन कुपोशीत दिसत असलेली गाय.
2) 20,000/-रू. एक पांढ-या रंगाची खिलार जातीची देशी गाय वय अंदाजे 4 ते 5 वर्षे असुन कुपोशीत दिसत असलेली गाय. 3) 15,000/-रू. एक पांढ-या रंगाची खिलार जातीची देशी गाय वय अंदाजे 3 ते  4 वर्षे असुन कुपोशीत दिसत असलेली गाय तसेच गोवंश कत्तल करण्यासाठी लागणारे धारधार शस्त्रे व इतर साहित्य असे ५५०००/- रू. येणेप्रमाणे मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे.
      गुन्हा ठाणे अंमलदार – पोहवा थोरात व तपासी अंमलदार- पो हवा मोहोळे तसेच प्रभारी पोलिस अधिकारी- पोलिस निरिक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक