पोस्ट्स

"दर्पणकार" आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा

इमेज
महाराज्य टाईम्स: बारामती उप माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम पत्रकारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास तहसीलदार गणेश शिंदे उप माहिती कार्यालयातील कर्मचारी,पत्रकार स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख,संतोष जाधव,अजिंक्य सातकर, सुनिल शिंदे, उमेश दुबे, दशरथ मांढरे, चेतन शिंदे, सुरज देवकाते, आंनंद धोंगडे,निलेश जाधव, संतोष सवाने, महेंद्र गोरे,संतोष शिंदे,संदीप साबळे, संतोष पांढरे,भारत तुपे,तैनुर शेख उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया संपादक संघ महाराष्ट्र राज्य, संपादक पत्रकार संघ बारामती, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बारामती, प्रेस क्लब बारामती, व्हॉइस ऑफ मीडिया बारामती, वृत्तपत्र संपादक पत्रकार संघ बारामती,पत्रकार संघ बारामती,भारतीय पत्रकार संघ या सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.    यावेळी बारामती उपविभागीय अधिकारी श्री.नावडकर व तहसीलदार श्री.शिंदे यांनी पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन सन्मान कर...

मोहोळ बस स्थानकावर बर्निंग बसचा थरार !! चालक-वाहकाच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ !!

इमेज
महाराज्य टाईम्स: (प्रभाकर बावधनकर) दि.५ जाने. :       मोहोळ बसस्थानकावर प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेट घेतल्याने बसचे इंजिन आणि चालकाच्या आसनाजवळील भाग जळून पूर्णपणे नष्ट झाला. सुदैवाने चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे मोठी आग पसरण्याचा व जिवितहानीचा अनर्थ टळला.       सांगोला डेपोच्या (क्रमांक MH-11 BL 9451) बसने सांगोला- हैदराबाद मार्गावर मोहोळ बसस्थानकावर सकाळी १२ वाजता थांबली. त्यावेळी बसचालक सुनिल काशीद यांना इंजिनमधून धूर येताना दिसला. त्यांनी लगेच वाहक विजय बंडगे यांना सांगितले आणि दोघांनी प्रवाशांना बसमधून गडबडीने बाहेर उतरवले.       याचदरम्यान इंजिनमध्ये आगीने पूर्णपणे पेट घेतला. तसेच या बसमध्ये एकूण असे  ७३ प्रवासी होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक नियंत्रक, एसटी कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्नांमुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही आणि बसस्थानकातील बस सेवा सुरळीत केली.        बस पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपास उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते जिब्राईल शेख, चंदू गोडसे, सोमनाथ पवार, शै...

*बारामतीत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट येरवडा कारागृह, पुणे येथे रवानगी

इमेज
महाराज्य टाईम्स (३ जानेवारी) :        बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई..        बारामती शहरामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या पुढील आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने आरोपी 1) यश दीपक मोहिते , 2) शुभम उर्फ बाळू काळू जगताप दोघे रा. आमराई,  बारामती 3) आदित्य राजू मांढरे रा.  चंद्रमणी नगर अमराई बारामती व. 4) अनिकेत केशवकुमार नामदास रा. दीपनगर भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी केलेली आह...

भारतमाता (देव,देश,धर्म) रक्षणासाठी वंदे मातरम् रक्षा रॅली चे आयोजन

इमेज
महाराज्य टाईम्स: (२ जानेवारी) दि. ०३/०१/२०२५ रोजी, वार शुक्रवार, सकाळी ९ वाजता बारामती येथे भिगवण चौक (राष्ट्रीय हुतात्मा चौक) येथून भारतमाता (देव, देश, धर्म) रक्षणासाठी वंदे मातरम् रक्षा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूक शांतता रॅली मध्ये जैन आचार्य वैराग्यरत्न सागर महाराज एवमं क्रांतिकारी जैन आचार्य श्री. विरागसागर महाराज यांच्या प्रेरणा व नेतृत्व व मार्गदर्शनाखाली निघणार आहे. सोबत राज्यव्यापी गोरक्षणाचे कार्य करणारे गोरक्षक शिवशंकर स्वामी असणार आहेत. सदरील मिरवणूक भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक, गुणवडी चौक गांधी चौक व तदनंतर स्टेशन रोड येथिल जैन मंदीर येथे समारोप होणार आहे. त्यासाठी समस्त हिंदू, शीख, जैन, बौध्द बांधव बारामती यांनी सहभागी व्हावे अशी विनंती सकल राष्ट्रप्रेमी संघटनेनी बारामतीकरांना केली आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमीः डिसेंबरचा हप्ता मिळण्यास आजपासून सुरुवात, 1500 जमा होणार

इमेज
महाराज्य टाईम्स (२४ डिसेंबर)  लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमीः डिसेंबरचा हप्ता मिळण्यास आजपासून सुरुवात, 1500 जमा होणार; 2100 साठी प्रतीक्षा काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार, अशी माहिती दिली होती. त्यानंतर योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे आता सहावा हप्ता 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती. दरम्यान, आता सहावा हप्ता हा 1500 रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरचा हप्ता दोन टप्प्यांत मिळणार या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपयांप्रमाणे पैसे ...

महाराष्ट्र सरकार : खाते वाटप गृह खाते हे देवेंद्र फडणवीस, अर्थ अजित पवार, गृहनिर्माण एकनाथ शिंदे

इमेज
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. जाणून घ्या, कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले... चंद्रशेखर बावनकुळे - महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा गणेश वाहन - पर्यटन दादाजी भुसे - शालेय शिक्षण संजय राठोड - माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल - मार्केटिंग प्रोटोकॉल पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्...

कॅनाॅल रोडच्या मोठ्या खड्ड्यामुळे चार दिवसात अनेक दुचाकीस्वार जखमी ! प्रशासनाला जाग केव्हा येणार? ?

इमेज
महाराज्य टाईम्स :(२८ आँक्टो)      बारामती शहरातील उच्चभ्रू परिसरातील समजला जाणारा अत्यंत रहदारीचा कॅनाॅल रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या खड्यामुळे दुचाकी वाहने पडून अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना जाग कधी येणार? ? नागरिकांचा सवाल?        या गंभीर विषयी महाराज्य टाईम्स मध्ये २४ आँक्टोबर ला बातमी प्रसिध्द झाली होती त्यानंतर प्रशासनाने चार दिवसात कुठलीही तत्पर कारवाई न केल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक महिला दुचाकीस्वार गाडीवरून पडल्याचे व दोन महिलांना गंभीर दुखापत झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळाले आहे.       शहरातुन माळावरील देवीला जाणारा कॅनाॅल लगतचा रस्ता सध्या खुप प्रसिद्ध झाला आहे. कॅनाॅलच्या भिंतीला लागुनच तेथे प्रचंड सुशोभिकरण करण्यात आले. दगडी पायर्या, खेळणी, रंगरंगोटी व शोभिवंत झाडे अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशोकनगर, माळावरची देवी, अंबिकानगर, देसाई ईस्टेट परिसरातील जागेचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहेत. परिसरातील बिल्डर खुप खुष झाले आहेत कारण ...

एकीकडे सुशोभीकरण ! तर दुसरीकडे रस्त्यांचे भकासीकरण ? कॅनाॅलरोड रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी !

इमेज
महाराज्य टाईम्स :(२४ आँक्टो)      बारामती शहरातील उच्चभ्रू परिसरातील समजला जाणारा अत्यंत रहदारीचा कॅनाॅल रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या खड्यामुळे दुचाकी वाहने पडून अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी काहीच करत नसल्याचे चित्र आहे.      बारामती शहरातुन माळावरील देवीला जाणारा कॅनाॅल लगतचा रस्ता सध्या खुप प्रसिद्ध झाला आहे. कॅनाॅलच्या भिंतीला लागुनच तेथे प्रचंड सुशोभिकरण करण्यात आले. दगडी पायर्या, खेळणी, रंगरंगोटी व शोभिवंत झाडे अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशोकनगर, माळावरची देवी, अंबिकानगर, देसाई ईस्टेट परिसरातील जागेचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहेत. परिसरातील बिल्डर खुप खुष झाले आहेत कारण फ्लॅटचे दर १००० ते २००० रु. ने वाढले आहेत. असे सुतोवाच सुद्धा अजितदादांनी व्यापारी मेळाव्यात भाषण करताना केले होते.       मग एकीकडे येवढे प्रचंड सुशोभिकरण असताना त्यालाच लागून असलेल्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मोठे दगड वर आले आहेत. तब्बल एक फुट खोल असा खड्डा असल्यामुळे नुकताच ...

बारामतीत पुतण्या युगेंद्र पवार आव्हान देणार ?, 64 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे ?

इमेज
महाराज्य टाईम्स: (२३ आँक्टो) गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार आहे. दरम्यान काही दिवसांपासून अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. त्यांचे सुपुत्र जय पवार हे मतदारसंघातून उभे राहतील अशा चर्चा सुरू होत्या. पण या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांसह सुनील तटकरेंनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे आता बारामतीमधून मविआतून उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी निवडणुकीच्या घोषणा होताच. शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार बंधू एकमेकांच्या विरोधात...