मोहोळ बस स्थानकावर बर्निंग बसचा थरार !! चालक-वाहकाच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ !!


महाराज्य टाईम्स: (प्रभाकर बावधनकर) दि.५ जाने. :
      मोहोळ बसस्थानकावर प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेट घेतल्याने बसचे इंजिन आणि चालकाच्या आसनाजवळील भाग जळून पूर्णपणे नष्ट झाला. सुदैवाने चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे मोठी आग पसरण्याचा व जिवितहानीचा अनर्थ टळला.
      सांगोला डेपोच्या (क्रमांक MH-11 BL 9451) बसने सांगोला- हैदराबाद मार्गावर मोहोळ बसस्थानकावर सकाळी १२ वाजता थांबली. त्यावेळी बसचालक सुनिल काशीद यांना इंजिनमधून धूर येताना दिसला. त्यांनी लगेच वाहक विजय बंडगे यांना सांगितले आणि दोघांनी प्रवाशांना बसमधून गडबडीने बाहेर उतरवले.
      याचदरम्यान इंजिनमध्ये आगीने पूर्णपणे पेट घेतला. तसेच या बसमध्ये एकूण असे  ७३ प्रवासी होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक नियंत्रक, एसटी कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्नांमुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही आणि बसस्थानकातील बस सेवा सुरळीत केली.
       बस पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपास उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते जिब्राईल शेख, चंदू गोडसे, सोमनाथ पवार, शैलेश स्वामी, बिलाल शेख, पिण्याचे पाणी घराघरात पुरवणारे शुभम शेटे, स्थानिक 'एसटी' कर्मचारी तानाजी गायकवाड, बबलु देसाई, वाहतूक नियंत्रक दादा उन्हाळे, पोलिस वाहतूक व्यवस्थेचे संजय नेमाजी, महादेव रोडे यांच्यासह अनेकांनी तात्काळ आग आटोक्यात आणली आणि बसस्थानकातील बस सेवा सुरळीत केली.

"बसस्थानकात नोंद करण्यासाठी उतरल्यानंतर, मला इंजिनमधून धुर येत असल्याचे आणि आग लागल्याचे लक्षात आले. त्वरित वाहक विजय बंडगे याला ओरडून सांगत, आम्ही दोघांनी प्रवाशांना गडबडीने बसमधून खाली उतरायला सांगितले आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ही आग इंजिनमधील वायरच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असावी. -- सुनिल विलास काशीद, बसचालक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक