भारतमाता (देव,देश,धर्म) रक्षणासाठी वंदे मातरम् रक्षा रॅली चे आयोजन
महाराज्य टाईम्स: (२ जानेवारी)
दि. ०३/०१/२०२५ रोजी, वार शुक्रवार, सकाळी ९ वाजता बारामती येथे भिगवण चौक (राष्ट्रीय हुतात्मा चौक) येथून भारतमाता (देव, देश, धर्म) रक्षणासाठी वंदे मातरम् रक्षा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूक शांतता रॅली मध्ये जैन आचार्य वैराग्यरत्न सागर महाराज एवमं क्रांतिकारी जैन आचार्य श्री. विरागसागर महाराज यांच्या प्रेरणा व नेतृत्व व मार्गदर्शनाखाली निघणार आहे. सोबत राज्यव्यापी गोरक्षणाचे कार्य करणारे गोरक्षक शिवशंकर स्वामी असणार आहेत. सदरील मिरवणूक भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक, गुणवडी चौक गांधी चौक व तदनंतर स्टेशन रोड येथिल जैन मंदीर येथे समारोप होणार आहे. त्यासाठी समस्त हिंदू, शीख, जैन, बौध्द बांधव बारामती यांनी सहभागी व्हावे अशी विनंती सकल राष्ट्रप्रेमी संघटनेनी बारामतीकरांना केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा