योगेश नालंदे ठरले पहिले पत्रकार ज्यांना मिळाला राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !!



महाराज्य टाईम्स: - १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विभागातून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.
      बारामती मधील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 2024 सालचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्यपाल श्री जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दत्तात्रय भरणे कृषिमंत्री, आशिष जयस्वाल कृषी राज्यमंत्री, भरत शेठ गोगावले व इतर मान्यवर उपस्थित होते.
      अवघ्या एक वर्षात तब्बल 365 शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिली. या यशोगाथांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि सकारात्मक शेती संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी कृषी प्रसाराचे मोठे कार्य केले. कृषी वाहिनीवर काम करताना बाजारभाव, हवामान अंदाज आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे नाट्यरूपंतर ऑडिओ बनवून रेडिओ वरून प्रसारित केले. यासह कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहचली जाते. यासाठी शेतकरी योद्धा या वृत्तपत्राची सुरवात नालंदे यांनी केली आहे. हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. 
      कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली यासह भविष्यात देखील महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी काम करत आहे आणि करत राहिल असा शब्द उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक