पुणे जिल्ह्यातील सर्वच शाळांना उद्या ६ जुलै रोजी सुट्टी जाहिर !! - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महाराज्य टाईम्स: (बारामती) भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Thunder and lightning in Pune) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा दि.०६/०७/२०२६ रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज आदेश जाहिर केले.
याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांना (जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, खाजगी शाळा, अनुदानित व विना अनुदानित खाजगी शाळा, इंग्लिश मिडीयम शाळा, सर्व अंगणवाडी) या सर्व शाळांना दिनांक ०६/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा