स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी


महाराज्य टाईम्स: (बारामती) 
       सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश आज १५ जुलै संध्याकाळी ६ वाजतां जारी केला आहे.
या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे अधिकृत आदेश राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या या निर्णयामुळे अजितदादांच्या लोकसेवेचा वारसा आता अधिकृतपणे जपला जाणार आहे.

शासनाने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीची घेतली दखल:

राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, अजितदादांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती केली जाणार:

शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार, येत्या बुधवारी, २२ जुलै २०२६ रोजी राज्यभरात अजितदादा पवार यांची जयंती साजरी केली जाईल. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दादां'च्या योगदानाला शासनाची आदरांजली :

स्वर्गीय अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांनी जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना राजकारणात हक्काचे 'दादा' हे स्थान मिळाले होते. राज्य शासनाचा हा नवीन निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत लोकसेवेला दिलेली एक मोठी आणि कृतज्ञतापूर्वक आदरांजली मानली जात आहे.

अजित पवारांच्या जयंतीच्या निर्णयानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया:

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासनातर्फे राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंतीप्रमाणे साजरी करण्याच्या राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे. शासनाचा आदेश निघताच त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत आपली कृतज्ञता व्यक्त केली. "हा दादांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या अविरत लोकसेवेचा खरा सन्मान आहे," अशी प्रतिक्रिया देत मुंडे यांनी राज्य शासनाचे मनस्वी आभार मानले आहेत. 'धन्यवाद महाराष्ट्र शासन !' असे ट्विट करत त्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल सरकारला धन्यवाद दिले आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक