पुणे येथील बालगंधर्व रंगमंच ५८ वा वर्धापन दिनी बारामतीच्या गायकांचा सन्मान !!
बारामती: (महाराज्य टाईम्स): बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापनदिनी बारामती व परिसरातील संगीत व गायन क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांचा रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुप प्रस्तुत बहारदार कॅराओके गीतांच्या कार्यक्रम सादर करण्याची संधी आयोजकांनी देऊन ग्रुपचा मोठा सन्मान केला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव २४, २५ व २६ जून २०२६ रोजी गेल्या १९ वर्षापासून सातत्याने आणि दिमाखात साजरा करण्यात येत असतो अशा प्रसंगी बारामतीच्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची अमूल्य अशी संधी मिळाली होती.
जुन्या गाण्यांच्या तालावर प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट:
रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुपने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील एकापेक्षा एक सरस, दर्जेदार आणि लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुरेल गायन, उत्कृष्ट सादरीकरण आणि कलाकारांमधील समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला. प्रत्येक गाण्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होत होता.
बारामतीच्या गायकांनी जिंकली पुणेकरांची मने:
या कार्यक्रमात सागर जगताप, वर्षा शिशुपाल, सचिन जगताप, सोमनाथ नाळे, नाथाभाऊ सरतापे आणि समीर पठाण यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांची मने जिंकली. सर्व कलाकारांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली. कार्यक्रमादरम्यान अनेक रसिकांनी कलाकारांचे विशेष कौतुक करत त्यांच्या गायनाची प्रशंसा केली.
समीर पठाण यांची संगीत व आँर्केस्ट्रा क्षेत्रातील १२ वर्षांची तपश्चर्या :
समीर पठाण गेल्या १२ वर्षांपासून ऑर्केस्ट्रा आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुपला राज्यभरात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील या ग्रुपच्या नावावर कॅराओके गायन क्षेत्रातील तीन वेगवेगळे जागतिक विक्रम नोंदवले गेले असून ही बारामतीसाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे.
समिर पठाण यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रिय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रामुख्याने ११ आँक्टोबर २०२५ रोजी वर्ल्ड रेकाॅर्ड आँफ वंडरबुक, २५ डिसेंबर २०२५ रोजी वर्ल्ड रेकाॅर्ड आँफ जिनियस बुक, नुकताच वर्ल्ड रेकाॅर्ड आँफ ग्रेट इंडियन बुक हा पुरस्कार २५ मार्च रोजी देण्यात आला आहे. आणि आता बालगंधर्व रंगमंचावर गायनाची संधी व सन्मान झाला.
रिस्टार्ट एन्टरटेन्मेंट ग्रुपमध्ये अनेक गुणी आणि अनुभवी कलाकारांचा समावेश असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून या ग्रुपने सातत्याने दर्जेदार सादरीकरण केले आहे. नुकताच बारामती येथे नटराज नाट्य मंदिरात "मुकद्दर का सिकंदर" हा संगितमय कार्यक्रम साजरा केला होता त्यास बारामतीकरांनी उत्फुर्तपणे दाद दिली मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती. त् कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यावरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला होता.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनात या यशस्वी सादरीकरणामुळे बारामतीच्या कलाकारांच्या कलागुणांना राज्यस्तरावर आणखी एक प्रतिष्ठेचे व्यासपीठ मिळाले असून, शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात हा क्षण अभिमानास्पद मानला जात आहे.
.jpg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा