बारामती मध्ये प्रथमच, श्री कुलदेवी सह साडेतीन शक्तीपीठांचा मूर्तीरूप दर्शन महोत्सव

.
(बारामती : महाराज्य टाईम्स)
श्री तुळजाभवानी माता, करवीरनिवासीनी श्री अंबाबाई, वणीची श्री सप्तश्रृंगी माता, माहूरची श्री रेणुका माता तसेच राजस्थान आणि गुजरात मधील जैन, माहेश्वरी, सकल राजस्थानी समाजाच्या जवळपास 48 कुलदेवींची हुबेहूब मूर्ती ही नवरात्रीच्या पावन दिवसात प्रथमच आपल्या बारामती नगरीमध्ये दर्शन, पूजा-अर्चना साठी श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.

शहरातील श्री महावीर भवन येथे शनिवारी, 21 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजल्यापासून तसेच 22 आणि 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत दर्शन सेवा उपलब्ध राहणार आहे.

या महोत्सवामध्ये सर्व कुलदेवींची रोज आरती, भजन चे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व कुलदेवींची थोडक्यात माहिती, आख्यायिका यांचे सुद्धा माहितीपत्रक हे लावले जाणार आहेत...

या पुण्यदायी, अलौकिक, सामाजिक तथा धार्मिक महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हान श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीचे सदस्य स्वप्निल मुथा, गुणेश भेडा, सीए सम्राट सोमाणी, मंदार सिकची, सचिन बोरा, सुयोग मुथा, गौरव कोठाडिया, सचिन मुथा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक