मोहोळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी !! सव्वा सहा कोटीचे मफेड्रोन ड्रग्स पकडले. २ जण ताब्यात



मोहोळ,: (प्रभाकर बावधनकर)
सोलापुर ग्रामीण पोलीस दलाच्या कारवाईत आज पुणे सोलापूर महामार्गावर दोन जणांकडून सहा कोटी दोन लाख रुपयांचे मेफेड्रॉन व त्यापासून ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दहा लाख 9 हजार रुपये असा 6 कोटी 12 लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला.
मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप झालटे यांना 17 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयात खबऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की, सोलापुर ते पुणे हायवे रस्त्यावर देवडी गावच्या फाट्यावर एका हॉटेलजवळ (ता. मोहोळ, जिल्हा. सोलापुर) येथे काहीजण मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विकी करण्याकरीता येणार आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर श्री झालटे यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना याची माहिती दिली त्यानंतर घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांना या संदर्भातील माहिती दिली त्यांच्या सूचनावरून सापळा रचला.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील साधे वेशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करून, मागण्यांचे गटविकास अधिकारी महेश सुळे व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत देवडी गावचे फाट्याजवळ मोहोळ येथे सापळा रचून ड्रग्ज तस्कर येण्याची वाट पाहत थांबले.

रात्री १०.३० वा. च्या सुमारास एका चारचाकी गाडी हॉटेल श्री. साई समोरील मोकळया जागेत येऊन थांबली. त्यामधील एक इसम पाठीवर सॅक अडकवुन गाडीतून खाली उतरून आजुबाजुच्या परिसराची पाहणी करू लागला असता, दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलीस त्याचे दिशेने जाऊ लागले. त्याला पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो घाईघाईत तेथून पळून जात असताना पोलीसांनी त्याला गराडा घालून जागेवरच पकडले.
त्याला त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने दत्तात्रय लक्ष्मण घोडके (रा. मु.पो. औंढी ता. मोहोळ, जि. सोलापुर) असे असल्याचे सांगितले, त्यावेळी त्याचे सोबत गाडीमध्ये बसून असलेल्या साथीदारास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव गणेश उत्तम घोडके (रा. औंढी ता. मोहोळ जि. सोलापुर) असल्याचे सांगितले.
विनोद घुगे यांनी महेश सुळे व पंचांचे समक्ष दत्तात्रय लक्ष्मण घोडके याचे ताब्यातील बॅगची झडती घेतली असता त्यांचे जवळ आंतरराष्ट्रीय बाजारात सहा कोटी पाच लाख चौदा हजार पाचशे रूपये किंमतीचे मफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १ मोबाईल फोन व ३ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. त्याचा साथीदार गणेश उत्तम घोडके याची झाडती घेतली असता त्याचे जवळ २ मोबाईल व एक हुंदाई कार असा ऐवज मिळाल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले व अटक केली.

त्यांचेकडे तपास केला असता एस. एस. केमीकल लि. (२९/३० चंद्रमौळी एम. आय. डी. सी. मोहोळ) येथे ड्रग्ज बनवण्याचे साहित्य व कच्चा माल लपवून ठेवल्याचे सांगितल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी छापे टाकले. तेथे त्या कारखान्यातून १० लाख ९ हजार ७०४ रूपयांचे मफेडॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ बनवण्याचा कच्चा माल जप्त केला.

ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र श्री. दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहायक निरीक्षक प्रदिप झालटे, फौजदार सुधिर खारगे, खापरे, रविराज कांबळे, राजेंद्र राठोड, महेबुब " शेख, अमोल भिसे, देशमुख, अमोल घोळवे, सचिन माने, प्रविण साठे, सिध्दु मोरे, सतिश रूपनर, अविराज राठोड, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत, अजित मिसाळ, सोलनकर, राजश्री कोल्हे, हरीदास आदलिंगे, समिर पठाण, शिवणे, डाखोरे, थोरात यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक