मा. पालकमंत्री अजित पवार, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आझाद मैदान, मुंबई येथे जागा मालकांचे आज उपोषण
बारामती: दि. २६ (महाराज्य टाईम्स) बारामती मेडद येथे म्हाडा प्राधिकरणाकडून खरेदीखत करून घेतलेल्या मालकीच्या जमिनी परस्पर अजित पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दबाव टाकून आमच्या जमिनीच्या नोंदी रद्द करून प्रकरण हायकोर्ट मुंबई येथे न्याय प्रविष्ट असताना आयुर्वेदिक कॉलेज चे नाव लावून बांधकाम चालू केले आहे. त्या निर्णयाविरोधात मुंबई येथे प्लॉट धारक उपोषण ला गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी बसणार आहेत.
मौजे मेडद ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. ४९४/२ ही जागा म्हाडा प्राधीकरण, पुणे यांच्या नावावर होती त्यानंतर सदर जागा सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व जिल्हाधीकारी मुद्रांक पुणे ग्रामीण यांच्या कडे कायदेशीर नोंदणी शुल्क भरून मानीव खरेदीखताने जवळपास २०६ व्यक्तींनी खरेदीखत करून विकत घेतली आहे. प्लॉट धारकांच्या नावावर म्हाडा प्राधीकरणाने सदर जागेची ताबा पावती नकाशासह सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्क्यानीशी दिली आहे. सदर जागा अजुनही प्लॉट मालकांच्या कब्जे वहिवाटीत आहे. अजुन त्यांनी कुणालाही खरेदीखत करून अगर कायदेशीर विक्री करून ताबा दिला नाही. किंवा म्हाडा प्राधिकरणाने सुध्दा त्यांच्या कडून खरेदीखत पलटवून जागेचा ताबा कायदेशीर मार्गाने परत घेतला नाही. तसेच सह जिल्हा निबंधक, पुणे किंवा सह दुय्यम निबंधक, बारामती यांचे कार्यालयात खरेदीचा व्यवहार म्हाडा प्राधीकरणाकडून आज तागायत झाला नाही. त्यामुळे सदर जागेची मालकी व ताबा पुर्णपणे प्लॉट मालकांच्या हक्कात आहे.
बेकायदेशीरपणे राजकिय हस्तक्षेपाने शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय यांचे नावाची नोंद करून प्लॉट धारकांवर अन्याय केल्याविषयी निषेध व्यक्त करण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण करण्यात येत आहे.
सदर जागेविषयी प्रकरण मा. जिल्हा सत्र न्यायालय, बारामती दावा क्र. ४३४/२०२१ व मा. उच्च न्यायालय, मुंबई दावा क्र. ३०३५ / २०२२ येथे न्याय प्रविष्ट आहे. तसेच त्यावर सुनावणीच्या तारखा चालू आहेत. मग सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असताना म्हाडा प्राधिकरण व मा. प्रांताधिकारी बारामती, मा. तहसिलदार बारामती, मा. गांव कामगार तलाठी मौजे मेडद तसेच मंडल अधिकारी मौजे उंडवडी यांनी परस्पर कायदेशीर जागेचा ताबा असलेल्या जमीन मालकांना कुठलीही अधिकृत कल्पना, हरकती नोटीस न देता व सदर जागेचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना जमीन मालकांना अंधारात ठेऊन परस्पर जागेच्या दस्तावेज ७/१२ यावर बेकायदेशीरपणे राजकिय हस्तक्षेपाने व शासकिय अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून म्हाडा प्राधिकरणचे नांव रद्द करून शासकिय आयुर्वेदिक कॉलेज यांचे नावाची नोंद केल्याचे दि. ५ जुलै २०२२ रोजी मा. तलाठी मौजे मेडद ता. बारामती यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत ७/१२ वर झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कृत्य हे परस्पर संगनमताने, बेकायदेशीरपणे व शासकिय अधिकारांचा गैरवापर करून मुळ जमीन मालकांना जागेतुन हटवण्यासाठीच्या हेतुने व अन्यायकारक पध्दतीने अंधारात ठेऊन मा, न्यालयात सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना मा. न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान केल्याचे दिसुन येत आहे. सदर प्रकरणा विषयी आम्ही दि. ६ जुलै २०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता पण त्यावर कुठलीच कारवाही झालीच नाही.
एकूण प्रकरण बघितले तर तत्कालीन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालक मंत्री अजित पवार यांनी प्रांतधिकरी व तहसीलदार यांना सूचना व आदेश देऊन 7/12 वर आयुर्वेदिक कॉलेजचे नाव तातडीने नोंद करून प्लॉट मालकांना अंधारात ठेऊन कुठलीही पर्यायी योग्य व्यवस्था न करता बांधकामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
उपोषणादरम्यान प्लॉट मालकांना जर काही आरोग्याविषयी किंवा जीवितास धोका निर्माण झाल्यास सदर अन्यायामुळे मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास देण्यास कारणीभूत असणारे म्हणजे आदेश, सूचना व शिफारस करणाऱ्या व्यक्ती म्हणजे मा.पुणे जिल्हा पालकमंत्री मा.अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, मा.गृहनिर्माण मंत्री मा.जितेंद्र आव्हाड, मा.नगराध्यक्ष सौ. पौर्णिमा तावरे हे सर्वस्वी जबाबदार असतील असे लेखी निवेदन सर्व प्लॉट मालकांकडून बारामती शहर पोलिस स्टेशनला व मुंबई पोलिस यांना देण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा