बारामती कराटे क्लब आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा चे आज आयोजन !! नक्की बघावी अशी स्पर्धा
बारामती: (महाराज्य टाईम्स ) रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी ' बारामती कराटे क्लब ' आयोजित ओपन राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ' राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, भिगवन रोड, बारामती ' येथे संपन्न होत आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये *महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील तब्बल ४४८ कराटे खेळाडू* सहभागी झाले आहेत.
त्यामुळेच अत्यंत रोमांचक होणाऱ्या या ओपन राज्यस्तरीय कराटे स्पर्धांकरिता *सकाळी ९ पासून ते संध्याकाळी ६ पर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत. आज रविवार सुट्टी असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना नक्की बघण्यासाठी घेऊन जावे अशी ही रोमांचकारी व शरीराचा कस लावणारी स्पर्धा आहे. आजकाल मोबाईल, टीवी मूळे खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. कराटे म्हणजे शक्ती आणि युक्ती चा खेळ आहे.
तरी चुकवू नये असे काही असा खेळ बघण्यासाठी नक्की ज्याने महत्त्वाचे आहे.
प्रसिद्ध कराटे चॅम्पियन मिननाथ रमेश भोकरे यांच्या मार्गदर्शनाने सादर स्पर्धा पार पडणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा