नाराज मंत्र्यांनी पाहिजे ते जिल्हे मिळवले ! एसटीच्या प्रवाशांना सुविधा कधी मिळणार? पालक झालेले मंत्री लक्ष देणार का??
बारामती(दि.५): बारामती शहरात कसबा येथे तात्पुरते केलेले एसटी बसस्थानकात प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास सोसावा लागत असल्याचे दिसुन आले आहे. स्वच्छ सुंदर बारामतीत प्रवाशांचे हाल एसटी गाड्यांच्या अनियंत्रित परिस्थितीमुळे रोजच होत आहेत.
बारामतीत विमानतळासारखे प्रचंड भव्य व सुंदर असे एसटी बसस्थानक नागरीकांच्या कष्टाच्या पैशातुन करोडो रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाल्यापासुन पर्यायी जागा म्हणून कसबा येथे कै.गुलाबराव ढवाण पाटील चौकात सुरू करण्यात आले होते. नवीन बस स्थानकाचे काम तब्बल दोन वर्षापासुन सुरू असुन कधी पुर्ण होईल याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
सुट्टी संपल्यामुळे स्टँडवर प्रवाशांची प्रचंड गर्दी रोजच दिसून येते. नियमित बाहेरगावी जाणारे प्रवासी असतातच पण कुटुंबाला घेऊन जाणारे प्रवासी सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा तर वाहतूक नियंत्रण केबिनमध्ये विचारले तर निट उत्तर मिळतच नाही. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाला उन्हात, पावसात किती वेळ थांबुन रहायचं हेच कळत नाही. तासन तास थांबल्यावर पण गाडी आलिच तर उदघोषना सुद्धा लवकर दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांनाच गाड्यांच्या पुढे मागे पळत जाऊन बोर्ड बघायची वेळ येत आहे. काही ड्रायव्हर तर बेफिकीरपणे बोर्डपणे लावत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये खुप नाराजी आहे.
पुण्याला जाणार्या प्रवाशांची तर संख्या तर खुप आहे. सकाळी ६ वाजल्या पासून रात्री १० पर्यंत पुण्याचे प्रवासी थांबलेलेच असतात. नाॅनस्टाॅप गाडीचा पर्याय अनेक वर्षांपासून खुप यशस्वी झाला आहे. पण गर्दीच्या वेळेला मुद्दाम साधी बस न लावता शिवशाही, हिरकणी अशा जास्त दर असलेल्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. रांगेत थांबलेल्या प्रवाशांना तिकट घ्यायच तर घ्या नाही तर बाजूला सरका असे कर्मचार्यांकडून फटकून बोलले जाते. त्यामूळे तास-दोनतास रांगेत थांबल्यावर साधी गाडीचे तिकिट न मिळाल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. साधी गाडी परत कधी येईल असे विचारले तर कर्मचारी उडवाउडवीची देत असतात. व काहीच माहिती नाही असे सांगून हात वर करतात.
वास्तविक पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. पण त्या वाक्याला कर्मचार्यांकडुन हरताळ फासलेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रवांशाची प्रचंड नाराजी प्रशासन व कर्मचार्यांना असल्याचे दिसून आले.
डेपो मॅनेजर एम.आय.डी.सी. डेपोत बसतात त्यामुळे ते स्टँड वर फिरकतच नाहीत. तसेच विभागीय नियंत्रक पुणे येथे असतात पण त्यांना वेळच नसतो. असे काही कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एकंदरीत ह्या अशा बेफिकीर अधिकारी व कर्मचार्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल आहेत.
चौकशी केबिनमध्ये तर कर्मचारी फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवतात. म्हणजे कुणी काॅल केला तर स्विच आँफ, पोहचू शकत नाही, व्यस्त आहे असे तासन तास ऐकायला मिळते. म्हणजे कर्मचार्यांना फोनवर बोलायचा त्रास नको म्हणून कामचुकारपणा आपल्या कर्तव्यात करत आहेत.
ज्या प्रवांशानी घरातुन चौकशीसाठी फोन केला त्यांना पोहचेपर्यंत उशीर झाला तर लांब पल्ल्याच्या गाड्या गेलेल्या असतात. त्यामुळे प्रचंड मनस्ताप होत आहे.
ज्या प्रवाशांच्या तिकिटाच्या पैशातून या नोकर लोकांना दर महिना हजारो रुपये पगार दिला जातो लोकांच्या सेवेसाठी त्या मालकांनाच मनस्ताप दिला जात आहे. म्हणजे लोकशाही नावालाच असुन नोकरशाही खुप बळावली आहे.
या सर्व गोष्टींचा स्थानिक आमदार, पालकमंत्री दखल घेणार का नाही? हा अत्यंत रागाने सवाल प्रवाशांनी महाराज्य टाईम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना विचारला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा