राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे.

महाराज्य टाईम्स दि. ४:  सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटत नव्हता अखेर अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाराजीनंतर  तिढा सुटला. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळले. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटला

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक