शहर वाहतुक पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! ! १११ बुलेट सायलेंसरवर फिरवला रोडरोलर

महाराज्य टाईम्स:१६ डिसेंबर
     बारामती शहरात बुलेट मोटर सायकल चे फटाका आवाजाचे सायलेंसर बसवून शहरात फटक्यासारखा आवाज करत फिरण्याची जणू फॅशनच झाली होती. त्याचा सामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत होता. 
अशा बुलेट मोटर सायकल वर कारवाई करण्याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम बारामती शहरात विविध ठिकाणी राबवण्यात आली. 
सदर मोहिमेमध्ये फटाका आवाज करणारे, बुलेट मोटर सायकलचे एकूण 111 सायलेन्सर काढून बारामती वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले आहेत.  
अवैद्य प्रवासी वाहतूक कारवाई :- 6
ड्रंक अँड ड्राईव्ह :- 5
काळी काच:- 51 फिल्मिंग काढण्यात आले.
तसेच खालीलप्रमाणे कलमान्वये कारवाई
1. विना नंबर प्लेट, 2. ट्रिपल सीट, 3. विना लायसन्स, 4. फॅन्सी नंबर प्लेट, 5. विना इन्शुरन्स,  6. मोबाईल संभाषण 7. काळी काच 8. नो पार्किंग 9. नो एंट्री 

अशा एकूण कारवाई 05/11/2025 ते 16/12/2025 रोजीपर्यंतच्या कालावधीत एकूण 2141 केसेस करून 21,58,350/ रुपये अशी मोटार वाहन कायद्यांतर्गत वरील विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल सो पुणे ग्रामीण. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सो, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सो बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश माने श्रेणी पीएसआय सुभाष काळे, पोलिस हवालदार प्रदीप काळे, पोलिस अंमलदार दत्तात्रय भोसले, अजिंक्य कदम, आकाश कांबळे, महिला अंमलदार सीमा घुले, सुनीता ढेंबरे, आशा शिरतोडे, माया निगडे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, रेश्मा काळे, पोलिस अंमलदार अमोल मदने, योगेश कुंभार, प्रवीण सांगळे, श्रीधर कांबळे, सुनील भंडारे होमगार्ड जवान अजित बिबे, थोरात, भंडलकर, पोंदकुले, खोमणे, नवले यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक