प्रभाग १६ मध्ये सौ.मंगल जगताप यांना मिळतोय मतदारांचा चांगला प्रतिसाद !! निवडणुक ठरतेय चुरशीची
बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक उमेदवारांचा कस पणाला लागणार आहे असे सध्या चित्र आहे.
प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सौ.मंगल जगताप यांचे कुटुंब तब्बल ५५ वर्षांपासून प्रभागातील नागरिकांशी चांगली ओळख व संपर्क असल्यामुळे मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी जरी राजकिय पक्षांनी उमेदवारी दिली असली तरी काही कट्टर एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली पण त्यांना डावलण्यात आले अशा ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवारांनी अपक्षपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरत आहे. सत्ताधारी पक्षाने जरी उमेदवारी दिली तरी मतदारांच्या मनात उमेदवार योग्य वाटत नसेल तर तिथं उमेदवाराला अपयश पदरात पडू शकते अशी परिस्थिती काही ठिकणी दिसून येते. मात्र जगताप कुटुंबाचा प्रभागातील जनसंपर्क असल्यामुळे तसेच पक्षाची ताकद कार्यकर्त्यांची साथ यामुळे सौ.मंगल जगताप यांचे पारडे जड असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कुटुंबातील जेष्ठ सदस्य असलेल्या सौ. मंगल शिवाजीराव जगताप यांना प्रभाग १६ ब मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातुन उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती अँड. श्री. शिवाजीराव तुकाराम जगताप, हे प्रसिद्ध विधीतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सन 1970 च्या दरम्यान याच प्रभागातील बाबरगल्ली येथील श्री. पेटकर यांचे निवासस्थानी वकिली व्यवसायाचे कार्यालय केले होते तद्नंतर सन. 1980 च्या दरम्यान नगरभुषण मा. नगराध्यक्ष स्व. कारभारी धोंडिबा (आण्णा) सातव, यांनी त्याच्या वकीली व्यवसायातील प्रामाणिक व निःस्वार्थ पणा पाहून बाबुजी नाईक वाडा (तहसील, प्रांत, कोर्ट व पोलिसस्टेशन) समोरील जागा ऑफिस व राहण्यासाठी दिली. त्यामुळे याच प्रभाग म्हणजेच कचेरी रोड, बागवान गल्ली, गोकुळ वाडी, तांदुळवाडी वेस यापरिसरात झाली त्यांचे संबध ही सर्व जातीधर्मात व व्यापारीवर्गात तील सर्वाशी स्नेह व आपुलकीचे राहिले आहेत.
त्यांचा मोठा मुलगा श्री. स्वप्निल (आण्णा) जगताप यांची सामाजिक, राजकीय कारकीर्द ही याच प्रभागात बहरली युवकांचे मोठ संघठन ही त्याची जमेची बाजू ह्याच कार्याची दखल घेऊन मा. ना. अजितदादा पवारसाहेब यांनी त्याला दि. माळेगाव स.सा. का. लि. शिवनगर माळेगाव चा सलग दुसऱ्यांदा संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली.
दुसरा मुलगा श्री. वैभव जगताप, ह्याची सामाजिक कार्याची सुरुवात अखिल तांदुळवाडी वेस दहीहंडी संघातील सामन्य कार्यकर्ता म्हणून झाली सन 2023 मध्ये बारामतीचा प्रसिद्ध नवसाला पावणारा आबा गणपती अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड सर्वानुमते झाली. ज्या मंडळास मा. शरदचंद्रजी पवारसाहेब, मा. ना. अजितदादा पवारसाहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) मार्गदर्शन लाभते त्या मंडळाचे अध्यक्षपद मिळणे ही बाब निश्चितच अंत्यत अभिमानास्पद आहे यांच संधीचा लाभ त्याने त्याच्या अध्यक्षपद कार्यकाळात या परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे या प्रभागात जगताप कुटुंबाला नागरिकांचा चांगला स्नेह व आपुलकी मिळाली आहे.
या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल व प्रभागातील सर्वच जेष्ठ मान्यवर व युवकाच्या भक्कम पाठबळावर मा.अजितदादा पवार यांनी बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक प्रभाग क्रमांक १६ मधून "ब" सर्वसाधारण महिला प्रवर्ग मधून सौ. मंगल शिवाजी जगताप यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची संधी दिली.
महाराज्य टाईम्सशी बोलताना उमेदवार सौ.मंगल जगताप यांनी मतदारांना विश्वास व्यक्त केला कि, " प्रभागातील प्रलंबित प्रश्न, अधिकचा विकास व आपल्या सेवेत संपुर्ण वेळ २४ तास उपलब्ध राहून काम करून दाखविण्याची ही आपल्या बहुमुल्य मताच्या रुपाने मिळणार आहे, मी आपणास यानिमित्ताने माझ्या दोन्ही मुलाच्या साथीने शब्द देते की की आपले मतदान रुपी मिळणारे आशिर्वाद हे मला राजकीय, सामाजिक काम करण्यास निश्चितच बहुमुल्य ठरतील. "
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा