निवडणूक अधिकार्यांच्या मनमानीमुळे मतदारराजाचा मतदानाचा हक्क हिरावला ?

महाराज्य टाईम्स:दि.२०  बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया संपत आली आहे. काही ठिकाणी वेळेत मतदान पडले असुन काही ठिकाणी उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया चालु होती अशी माहिती आहे.
      प्रभाग १६ व प्रभाग १० चे मतदान कदम चौक जवळ देशमुख सभागृह येथे पार पडले. परंतू निवडणूक बुथ प्रमुख कर्मचारी व अधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मतदारांमध्ये नाराजी व आक्षेप दिसून आला.
       तब्बल ९ वर्षांनंतर नगर पालिकांची निवडणूक असल्यामुळे प्रामुख्याने तरुणांंमध्ये मतदान करण्याचा उत्साह जास्त दिसून आला. अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. प्रभाग १६ चे मतदान देशमुख सभागृह येथे रांगेमध्ये उभे राहून मतदारांनी मतदान बुथ कर्मचार्यांना मोबाईल मधील डिजिलाॅकर किंवा ओळखपत्राचे फोटो दाखवले परंतू त्यांनी ते ग्राह्य न धरल्यामुळे अनेक मतदारांची ओळखपत्र आणुन मतदान वेळेत केले. 
       परंतू मतदान केंद्र क्र.६ येथे मतदार सर्वात शेवट दरवाजात उभा राहून कर्मचार्यांना विणवणी करत होता कि, मला मतदान करू द्या अर्धा तास तो दरवाजात उभा राहिला पण कर्मचार्यांनी दरवाजा लाऊन घेतला व मतदान यंत्र बंद केले आहे असे तत्काळ सांगितले. अजून निवडणूक निरिक्षक केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले देखील नाहीत तरी मतदान यंत्र बंद केले आहे असे कर्मचारी खोटे सांगून एका तरुण मतदाराला मतदानाचा हक्कापासुन जाणूनबुजून वंचित ठेवले.


निवडणूक कर्मचार्याच्या हुकूमशाही विरोधात आक्षेप नोंदवत मतदार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.
      तसेच प्रभाग क्र.१० साठी मतदान चालू असताना निवडणूक बुथ प्रमुख लोणकर नावाचा कर्मचारी मतदान करताना मतदाराला जवळ जाऊन कुठल्या उमेदवाराचे बटण दाबायचे हे सांगत होता अशी तक्रार उमेदवार सौ.अनिता गायकवाड व इतर मतदारांनी महाराज्य टाईमशी बोलताना केली. त्यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी पंकज भुसे व निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर यांना फोन करुन सर्व प्रकरणाची माहिती दिली असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे साचेबंद उत्तर दिले. पण पुढे काही प्रतिसाद दिला नाही.


 
        निवडणूक निरिक्षक शुभम सरवंडे यांनी हुकुमशाहीने शेवटी मतदाराला बाहेर काढण्यास सांगितले त्यानुसार पोलिसांनी मतदाराचा हक्क हिराऊन घेऊन बळाचा वापर करून गेटच्या बाहेर काढले.
        निवडणूक अधिकारीच जर मतदार राजांचा मतदानाचा हक्क हिराऊन घेत असतील तर जनतेचे नोकरच मालक झाले व मतदार राजा हा नावालाच राजा राहिला तो ह्यांच्या पुढे नोकर झाला असेच म्हणावे लागेल अशी तिव्र संतापाची भावना मतदारांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 



टिप्पण्या