तालुका पोलिसांची सुपरफास्ट कारवाई! ! लाखों रुपये लुटलेले दोन गुन्हेगार जेरबंद

५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त; तालुका पोलिसांची कारवाई

बारामती, दि.१० (महाराज्य टाईम्स)
     बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कुटीस्वारास लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
       फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील ३८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि ३ ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी पळून गेले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार राहणार बारामती हेच या लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील दागिने तसेच दागिने विक्रीतून मिळालेली १ लाख ४० हजार रुपये रक्कम अशा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
     ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली. या पथकात पो.उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, धनश्री भगत, ग्रेड पो.उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार व दादा दराडे यांचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक