श्रीमंत आबा गणपती मंडळाने निवडणूक हातात घेतली !! आणि जिंकून दाखवली! ! दिपाली गायकवाड यांचा पाठिंबा निर्णायक !!

महाराज्य टाईम्स: (दि.२४)
     बारामती नगर परिषद निवडणूक २०२५ अत्यंत लक्षवेधी ठरली ती अपक्षांच्या व सर्व राजकिय पक्षाच्या सहभागाने त्यामुळे उमेदवार संख्या वाढली व चुरस पण वाढली. परंतू प्रभाग क्र.१६ मध्ये अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया हातात घेतली आणि जिंकुनच दाखवली.
     प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून महिला उमेदवार सौ. मंगल जगताप उमेदवार होत्या तर पुरूषांमध्ये श्री गोरख पारसे उमेदवार होते. सौ.मंगल जगताप यांचा मुलगा वैभव जगताप हे आबा गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे अनेक वर्षांपासून मंडळाच्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात उत्तम सहभाग होता. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी मंडळात उत्तम काम तनमनधनाने केल्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल एक जवळिक मैत्री आहे. त्यामुळेच खर्या अर्थाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंग झटकून पूर्णवेळ देऊन निवडणूक हातात घेतली म्हणावी लागेल.
     उमेदवारीचा फाॅर्म भरण्यापासुन नियोजनबद्ध प्रचार, गाठीभेटी व प्रत्येक मतदारांशी प्रत्यक्ष भेट यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी प्रत्येकानी आपापल्या जबाबदार्या वाटून घेतल्या आणि अतिशय उत्तम नियोजन करून प्रचार व प्रसार केला. प्रत्यक्षात भाजप शिवसेना ह्या गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार समोर होते. राष्ट्रवादी पक्षातीलच काही इच्छुक नाराज सुद्धा होते. त्यामुळे लढत चुरशीचीच होती.

 "अपक्ष उमेदवार दिपाली गायकवाड यांचा पाठिंबा: मताचे विभाजन थांबले."

     प्रभाग १६ मध्ये मागील १५ वर्षांपासून नागरिकांची कामे व समस्या सोडवणारे मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव यांच्या पत्नी दिपाली गायकवाड या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या. श्रीकांत जाधव यांच्या विविध सामाजिक कामाच्या व प्रचंड जनसंपर्क व लोकांच्या पाठबळाबर खुप जोरात प्रचार सुरु केला व नागरिकांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता. परंतू मताचे ध्रुवीकरण म्हणजेच मतांची विभागणी होऊन दुसरा उमेदवाराला फायदा होऊन दुसरा उमेदवार निवडून आला असता म्हणून श्रीकांत जाधव यांची मनधरणी करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी तयार केले. आबा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना व एका पत्रकाराच्या प्रयत्नाला यश आले व श्रीकांत जाधव यांनी जाहिर पाठिंबा देऊन ये स्वतः राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला जाहिर पाठिंबा देऊन यशाचा मार्ग सुखकर करुन दिला. 

     " नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांचे बंधू नितीन सातव यांनी स्वतः सतत संपर्क करुन अजितदादांचे पुत्र पार्थदादा पवार यांची भेट करुन दिली व अजितदादांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी संधी देण्याची शाश्वती दिली व पाठिंबा घेतला गेला अशी माहिती श्रीकांत जाधव यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना दिली "

आबा गणपती मंडळाच्या प्रचंड मेहनतीमुळे व उत्तम नियोजनामुळेच सौ.मंगल जगताप भरघोस मतांनी विजयी झाल्या.

       महाराज्य टाइम्सच्या वतीने नगरसेविका सौ.मंगलकाकी जगताप यांचे हार्दिक अभिनंदन! !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक