शहर पोलिसांची बुलेट व इतर बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई

महाराज्य टाईम्स दि.६ बारामती शहरात बुलेट मोटर सायकल चे फटाका आवाजाचे सायलेंसर बसवून शहरात फटक्यासारखा आवाज करत फिरण्याची जणू फॅशनच झाली होती. त्याचा सामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत होता. अशा बुलेट मोटर सायकल वर कारवाई करण्याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन 
        आज दिनांक 06/12/2025  रोजी  बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम बारामती शहरात कोर्ट कॉर्नर येथे राबवण्यात आली. सदर मोहिमेमध्ये बुलेट मोटर सायकल वर मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच फटाका आवाज करणारे बुलेट मोटर सायकल चे सायलेन्सर काढून जमा करून घेण्यात आले. यामध्ये एकूण 20 सायलेन्सर बारामती वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले आहेत.  तसेच इतर 65 कारवाया व 73,000/ रुपयापर्यंत दंड करण्यात आला आहे.
       तसेच दरम्यान एक मोटार वाहन कायदा कलम ड्रंक अँड ड्राईव्ह प्रमाणे एक कारवाई करण्यात आलेले आहे.
         (भिगवण चौक येथील कारवाई)
त्याचप्रमाणे भिगवण चौक येथे देखिल धडक कारवाई करण्यात आली. ट्रिपलसिट व कायदा मोडणाऱ्या बेशिस्त वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल सो पुणे ग्रामीण. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सो यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश माने, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक  सुभाष काळे, 
महिला हे.काँ. स्वाती काजळे, सुनीता ढेंबरे, रुपाली जमदाडे,  रेश्मा काळे, पो.काँ.आकाश कांबळे, अमोल मदने, अजिंक्य कदम, कांबळे, होळंबे, सांगळे, पोंदकुले, बिबे खोमणे, नवले  यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक