निलेशआप्पा इंगुलेंनी केला गनिमी कावा ! मतदार म्हणाले हाच नेता हवा !!

महाराज्य टाईम्स:(दि.२२)
      बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अत्यंत लक्षवेधी व चुरशीची ठरली. काही राजकीय मंडळीचा भ्रम होता एकहाती सत्ता येणार पण अपक्षांची ताकद वाढली जनतेने चिन्हापेक्षा व्यक्तीला जास्त महत्व दिले याची ६ उदाहरणे बारामतीकरांनी बघितली.
     बारामतीतील सर्वात मोठा समजला जाणारा प्रभाग क्र. २० मध्ये जवळपास ७४०० मतदान होते. तसा मोठा असला तरी इंगुलेंचा परिचयाचा होता व्यवसायाच्या रुपाने आणि लहानपणीच्या ओळखीमुळे त्यामुळे आव्हान स्वीकारून त्यांनी कामाला लागले. पण अपक्ष निवडणूक लढवणे येवढे काही सोप्पे नव्हते कारण लढाई हि स्वकियांशी होती म्हणजे एकाच समाजातील नातेवाईकांशी होती तसेच ज्या पक्षाने राजकिय ओळख दिली त्या पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांच्या विरोधात दंड थोपठावे लागले.
     समोर सर्वच बाबतीत मोठी ताकद शक्ती राष्ट्रवादी पक्षाची होती. पण निलेश इंगुलेंनी अत्यंत गांभिर्याने विचारपुर्वक रणनिती आखली व मतदारांशी वैयक्तिक भेटी गाठीवर भर दिला. आणि गनिमीकावा कसा करायचा व यश कसे मिळवायचे ह्याचे नियोजन ४-५ जण सहकारी यांनी सुरु केले. निलेश इंगुलेंनी प्रचार रॅली काढली नाही किंवा कुठलाही गाजा वाजा न करता कायम एकटे फिरत असताना शांतीत क्रांती घडवुन आणली ते पण चांगल्या २३९ मतांनी विजयी होऊन.
बारामतीच्या राजकारणात अशी जब्बरदस्त व लक्षवेधी लढाई प्रथमच पाहण्यास मिळाली.
      "जनतेने मला राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात जाऊन माझ्या कर्तुत्वा वर विश्वास ठेऊन जनतेची कामे करण्या करिता निवडून दिले आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता जनता हाच माझा पक्ष म्हणूनच जनतेमध्ये वावरणारा कार्यकर्ता म्हणून अखंडपणे काम करत राहणार आहे. बारामतीचा विकास एका बाजूला व समर्थनगर, सटवाजीनगर, गुनवडी रोड, म्हाडा काॅलनी या भागातील बकालपणा व असुविधा बघून मी सुरुवात कामाला या भागातुन करणार आहे. जवळपास २० वर्षे मी नगरसेवक पदासाठी इच्छुक होतो पण काही अजितदादांच्या जवळच्या व्यक्ती माझ्याबद्दल कान भरायचे व मला डावलले जायचे. या ही वेळेस मी खुप अपेक्षा ठेवली होती पण पुन्हा माझा पत्ता कट करण्यात आल्यामुळे मी अपक्ष लढलो गनिमीकाव्याने आणि मतदारांनी बारामतीकरांना दाखवून दिले आम्हाला ह्योच नेता पाहिजे."
अशी भावना नवनिर्वाचीत नगरसेवक निलेशआप्पा इंगुले यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना व्यक्त केली.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक