बारामती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिरिष कुलकर्णी यांची बिनविरोध निवड! !


महाराज्य टाईम्स: (बारामती) 
     दि बारामती सहकारी बँक च्या अध्यक्षपदी अँड.शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी श्री. उद्भव सोपानराव गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
    मागील महिन्यामध्ये बारामती नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी असल्यामुळे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी बँकेचा पदाचा राजीनामा दिला होता व त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते नगराध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्यामुळे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद रिक्त राहिले होते.             
       कोणाची निवड होणार याची उत्सुकता बारामतीकरांना लागली होती. बारामती सहकारी बँकेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 38 शाखा बँकेच्या असून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यास अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची गरज होती त्यामुळे श्री शिरीष दत्तात्रय कुलकर्णी हे एक विधीज्ञ असून ते बारामती सहकारी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष पण आहेत.
      शिरिष कुलकर्णी हे प्रसिद्ध उद्योगपती व हाॅटेल व्यावसायिक सुद्धा आहेत. त्यांच्या परिवाराचे हाॅटेल लिलाज् भिगवण रोड येथे प्रसिद्ध हाॅटेल आहे. त्यांच्यासह सर्व परिवाराने अत्यंत सचोटीने व कष्टाने ५० वर्षांपासून दर्जेदार वडापाव तयार करुन स्वतःचा "महाराजा वडा" म्हणून ब्रँड विकसित व प्रसिद्ध केला आहे. 
     त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा विचार करुन स्व.अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच बारामती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी शिरीष कुलकर्णी यांना अध्यक्ष पद स्वीकारण्याचे संकेत दिले होते अशी चर्चा होत होती.

      बारामती सहकारी बँक समाजाच्या विश्वासाचा वारसा जपणारी बँक आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत स्व. अजितदादा पवार यांचे विचार, कार्य व योगदान सदैव मार्गदर्शक ठरले आहे. यापुढेही मा.सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगती करीत राहील.

      बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू. २२१२ कोटी, कर्जवाटप रू. १३७४ कोटी व गुंतवणूक रू. ९८० कोटी तर बँकेचा निव्वळ एन.पी.ए. २.५८% व भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १६.७२% अशी बँकेने प्रगती केलेली आहे. बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष कार्यरत आहे.

     या बैठकीदरम्यान संचालक मंडळाने पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष श्री. सचिन सातव, उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा (वडूजकर), तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), अँड. शिरिष कुलकर्णी तसेच संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, विजयराव गालिंदे, देवेंद्र शिर्के, उद्धव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, संचालिका डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक अँड. श्री. रमेश गानबोटे, व्यवस्थापन मंडळ सदस्य ओंकार देवळे तसेच कार्यकारी संचालक विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.
     
  बारामती सहकारी बँकेचे संस्थापक गुनवडी येथील ब्राम्हण समाजाचे स्व. खंडेराव म. खंडागळे होते. २३ सप्टेंबर १९६१ रोजी बँकेची स्थापना त्यांनी केली होती. त्यानंतर अनेक अध्यक्ष बँकेला लाभले. परंतू स्थापनेनंतर ब्राम्हण समाजाला अध्यक्ष म्हणुन प्रतिनिधित्व पहिल्यांदाच स्व.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार प्रतिष्ठेचे पद मिळाले असल्यामुळे ब्राम्हण समाजामध्ये समाधानाचे वातावरण पहाण्यास मिळत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक