भिगवण घटनेच्या निषेधार्थ बारामती बंद : व्यापारी महासंघ व सकल हिंदु समाजाच्या वतीने उद्या २३ रोजी बारामती बंद !!

महाराज्य टाईम्स (बारामती)

     भिगवण येथे हिंदु समाजातील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आज बारामती शहर व परिसरातील व्यवसाय व व्यापार सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याबाबत बारामती व्यापारी महासंघाला निवेदन देण्यात आले आहे.

      या निवेदनास पाठिंबा देत बारामती व्यापारी महासंघातर्फे पदाधिकार्यांची व सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सकारात्मक पद्धतीने पार पडली आहे. बैठकीत सर्वानुमते उद्या सोमवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत बारामती शहरातील बाजारपेठेतील सर्व प्रकारचे व्यापारी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी १२ नंतर सर्व व्यापार्यांनी व्यवहार पुन्हा दिवसभर सुरु करावेत असे कळविण्यात आले आहे.


     सदर बंद शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात यावा, तसेच या बंदमध्ये सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन बारामती व्यापारी महासंघातर्फे अध्यक्ष सुशिलकुमार सोमाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक