भिगवण घटनेच्या निषेधार्थ बारामतीकरांनी कडकडीत बंद करुन दाखवली सहानुभूती! !

     (इंदापुर चौक गुनवडी चौक परिसर)
महाराज्य टाईम्स:(बारामती)
     भिगवण येथे हिंदु समाजातील मुलीला पळवून नेण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे काल बारामती शहर व परिसरातील व्यवसाय व व्यापार सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याबाबत बारामती व्यापारी महासंघाला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने बारामतीकरांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद ठेऊन घडलेल्या गंभीर घटनेबद्दल आपली संवेदना व्यक्त केली आहे.
              (सिनेमा रोड परिसर)
      शहरातील.लहान मोठे दुकानदार, कापड, स्टेशनरी, किराणा, मेडिकल दुकाने विशेष करुन ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा चहाच्या, पानाच्या छोट्या टपर्या, हातगाडेवाले यांनी संवेदनशील विषयामुळे आपली सहानभुती व्यवसाय बंद ठेऊन व्यक्त केली.
    व्यापारी महासंघाच्या वतीने आवाहन केलेले अध्यक्ष सोमाणी यांनी सुद्धा त्यांचे हुंडाई चारचाकी वाहनांचे शोरुम, बजाज दुचाकी वाहनांचे शोरुम सकाळ पासून उघडलेच नसल्याचे दिसून आले. शेकडो कामगारांना थेट दुपारी येण्याच्या सुचना कालच दिल्या असल्याचे त्यांनी महाराज्य टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
     मात्र कसबा परिसरातील काही शोरुम, हाॅटेल व दुकाने सकाळपासूनच पूर्णपणे उघडण्यात आली होती याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती कि, हातावरचे पोट असलेल्यांनी आपली सहानभुती व्यक्त केली पण मोठे शोरुम वाले धंदे उघडे ठेऊन बसले आहेत. शेवटी ज्याच्या त्याचा विचार असतो असे म्हणून लोकांनी दुर्लक्ष केल्याची भावना होती.

     एकंदरीत सदर बंद शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक