संगमनेर येथील अल्पवयीन मुलीवरिल अँसिड हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी सुवर्णकार समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन
महाराज्य टाईम्स (बारामती) : संगमनेर येथील वडगाव पान येथे कुमारी ईश्वरी डहाळे या चिमुकलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व शिक्षा करण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे निवेदन सराफ सुवर्णकार संरक्षण समिती,बारामती च्या वतीने बारामती शहर पोलिस स्टेशन प्रशासनाला देण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे राहणाऱ्या संजय डहाळे यांच्या १३ वर्षांच्या इयत्ता ६ वी त शिकणाऱ्या चिमुकली वर अज्ञात माथेफिरूने अँसीड हल्ला करून त्या मुलीला जबर जखमी केले माणूसकीला काळीमा फासणार्या या नराधम समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करणयाची मागणी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती व सर्व शाखीय सोनार समाज यांच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडतील आसा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला ही संतप्त ठाम मागणी समितीच्या वतीने निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रशासनाला निवेदन देताना समितीचे विविध मान्यवर उपस्थित होते. प्रामुख्याने सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्याचे सह संपर्क प्रमुख उमेशशेठ बागडे, हितेश शेठ पंडीत बारामती तालुकाध्यक्ष, अमोलशेठ धर्माधिकारी, संघटक
विशालशेठ अनुसे, सरचिटणीस, श्री अमोल शेठ उदावंत, खजिनदार, श्रीकृष्ण शेठ पंडीत, सह खजिनदार, अमोल शेठ पंडीत, संपर्कप्रमुख, श्री योगीराजशेठ शहाणे, सह संपर्कप्रमुख
तसेच इतर समिती सदस्य रतन शेठ पंडीत, अनिल शेठ त्यारे व इतर समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा