बारामतीकरांना ११ व १२ मार्च रोजी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा होणार लाभ !!


बारामती: (महाराज्य टाईम्स)  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट यांच्या वतीने महाराष्ट्र पादुका परिक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार बारामती येथे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी 5 वाजतां आगमन व स्वागत बारामती शहरात होणार आहे.
      सद‍्गुरू श्री स्वामी समर्थ पादुका पालखी उत्सव समिती यांच्या वतीने अक्‍कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखी उत्सवाचे आयोजन बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वां. पालखीचे आगमन बारामती शहरात होणार आहे. पालखीचा मुक्‍काम चिराग गार्डन, रेल्वे स्टेशन समोर भिगवण रोड,बारामती येथे होणार आहे.
      सायंकाळी 7 ते 7.30 वाजता महाआरती व नामस्मरणाचा कार्यक्रम, महाआरती नंतर सर्व भाविक भक्‍तांना दर्शन व प्रसादाचे वाटपाचे आयोजन रात्री 11 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सायंकाळी. ७ ते १० वाजेपर्जंत जय गिरिनारी दत्तपंथी सोंगी भजनी मंडळ, वलझलवाडी, ता.खंडाळा यांच्या वतीने सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळेस श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी  दुसर्‍या दिवशीही गुरुवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ११ वां. पर्यंत श्री स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन व प्रसादाचा लाभ होणार आहे. दरवर्षी दर्शन व प्रसादासाठी एकच दिवस मिळत असल्याने लांबून येणार्यांना व नोकरदार वर्गाला दर्शनाचा लाभ घेण्यासाठी कसरत करावी लागत होती किंवा दर्शनाचे भाग्य मिळत नव्हते. मात्र आता सलग दोन दिवस श्री स्वामी समर्थ पादुकांच्या दर्शन लाभाची पर्वणी मिळाली आहे.

श्री स्वामी समर्थ पादुकांचा सार्वजनिक महाअभिषेक व दर्शन सोहळा दि. १२ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ होणार आहे. तसेच ज्या भाविकांना वैयक्तिक श्री स्वामी समर्थांच्या पादुकांना अभिषेक मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी शुक्रवार दि. १३ मार्च रोजी श्री स्वामी समर्थ मठ, महावीर पथ, लिबर्टी टेलर्स, नंदिनी रेडिमेड समोर येथे सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हजर रहावे. येताना अभिषेकासाठी दूध घेऊन यावे असे आवाहन आयोजक श्री स्वामी समर्थ पालखी उत्सव समिती, महावीर पथ, बारामती यांच्या वतीने श्री राजाभाऊ काका थोरात यांनी केले आहे. सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ पादुका पालखी पुढील गावी रवाना होणार आहे.
     तरी सर्व बारामती मधील भक्‍तांनी श्री अक्‍कलकोट स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा व  प्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी माहितीसाठी संपर्क.- 
श्री राजाभाऊ थोरात(काका)  मो.9860931637
श्री नवनाथ गजाकस -8600516666
श्री विकास जगताप -  7798391111




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक