व्हाटसअप व्हिडिओ काॅल करुन वृध्द महिलेची ४५ लाखांची आर्थिक फसवणुक !!



बारामती: (महाराज्य टाईम्स) 
शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 भा.न्या.सं. कलम 318(4), 319 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C) अन्वये सायबर फसवणुकीचा (Digital Arrest Scam) गंभीर प्रकार उघडकीस आला असून नागरिकांनी याबाबत विशेष सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी शकुंतला उद्धव खर्डे, वय 74 वर्षे, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांना दिनांक 14/02/2026 ते 27/02/2026 या कालावधीत मोबाईल क्रमांकावरून एका अनोळखी इसमाने WhatsApp द्वारे व्हिडिओ कॉल केला. सदर इसमाने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली.

सदर इसमाने भीती व मानसिक दबाव निर्माण करून फिर्यादी यांना त्यांच्या बँकेतील Fixed Deposit (एफ.डी.) तोडण्यास भाग पाडले व वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून ₹34,60,000/- व ₹11,00,000/- असे मिळून एकूण ₹45,60,000/- (पंचेचाळीस लाख साठ हजार रुपये) इतकी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केली. नंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. सदर प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना :
कोणताही व्यक्ती स्वतःला पोलीस, CBI, ED, न्यायालय किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फोन / व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट” किंवा अटक होईल अशी भीती दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.
कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत.

अशा प्रकारे भीती दाखवून पैसे मागितल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

शक्य तितक्या लवकर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी.
कोणतीही संशयास्पद लिंक, OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देऊ नये.

सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये त्वरित तक्रार देणे अत्यंत महत्वाचे असते. गुन्हा घडल्यानंतर शक्य तितक्या लवकर पोलीस स्टेशनमध्ये कळविल्यास संबंधित बँक खात्यांवर तातडीने कारवाई करून रक्कम गोठविणे (Freeze) शक्य होऊ शकते.

बारामती शहर पोलीस स्टेशनमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलीसांची मदत घ्यावी.
--- श्रीशैल चिवडशेट्टी, प्रभारी पोलीस निरीक्षक
     बारामती शहर पोलीस स्टेशन



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक