मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी माणुसकी जपली ! ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेट दिल्या सायकली !! दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक !!

महाराज्य टाईम्स(प्रभाकर बावधनकर): 
मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळालेले रमेश बारसकर यांनी वैयक्तिक खर्चातुन ११०० गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटून आपल्या दानशूरपणा व माणुसकी आपल्या कार्यातून दाखवून दिली आहे त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
     मोहोळकरांच्या मनात घर करून राहिलेले आपुलकीचे नाव म्हणजे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर कोणताही राजकीय वारसा नसताना, आपल्या कष्टावर, जिद्दीवर आणि प्रामाणिकपणावर उभा राहिलेला हा नेता आज प्रत्येकाच्या मनात आपुलकीने स्थान मिळवून आहे.
      शहरातील हजारो गरजू बांधवांना स्वतःच्या खर्चाने विविध प्रकारे मदत व सहकार्याच्या माध्यमातून समाजकार्य करणारा  हा दानशूर, दरियादिल माणूस म्हणजे रमेशजी बारस्कर अनेक कुटुंबांसाठी खरा आधार आहे अशी भावना नागरिकांच्या मनात दिसून येते. त्यांच्या या माणुसकीच्या कार्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आनंद आणि स्थैर्य निर्माण झाले आहे.
शहरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वखर्चाने ११०० सायकलींचे वाटप करून अनेक गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या जाण्याचा त्रास होऊ नये शिक्षणात कुठलाही अडसर होऊ नये म्हणून नवा मार्ग दिला आहे.
     या उपक्रमामुळे मोहोळ शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे सुलभ झाले असून, त्यांच्या भविष्यासाठी हा मोठा आधार ठरला आहे. जनतेची कामे प्रामाणिक, इमानी आणि सन्मानाने करणारा आपला नेता म्हणून रमेशजींकडे प्रत्येक जण विश्वासाने पाहतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय, लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याची त्यांची भावना हीच त्यांची खरी ताकद आहे अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांनी महाराज्य टाईम्सचे पत्रकार बावधनकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
     तरुण-तरुणींच्या आयुष्याशी निगडित असलेल्या लग्नाच्या प्रश्नासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा घेतलेला निर्धार हा त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा उत्तम नमुना आहे. शहराच्या पाणी प्रश्नासाठी प्रशासनाच्या दारात मटके फोडून त्यांनी जनतेचा आवाज बुलंद केला. तसेच, नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून जनतेच्या दारातील कचरा नगरपरिषदेमध्ये टाकण्यासारखे आंदोलन करत त्यांनी लोकांच्या वेदना व्यक्त केल्या हे त्यांच्या लोकाभिमुख वृत्तीचे प्रतीक आहे.
      मोहोळ शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा त्यांच्या मनात आहे. आजच्या पिढीसोबतच उद्याच्या पिढीचाही विचार करणारा हा नेता म्हणून ते सर्वांना आपलेसे वाटतात. त्यांच्या अखंड परिश्रमामुळे आणि काम करण्याच्या ऊर्जेमुळे मोहोळ शहरातील प्रत्येक नागरिकाचे काम सन्मानाने पूर्ण होत आहे. त्यामुळेच मोहोळकरांनी प्रेमाने त्यांना दिलेली पदवी  “वन मॅन शो”  ही त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे असे म्हनाले तर वावगे ठरणार नाही.
     रमेशजी बारस्कर हे केवळ नेता नाहीत, तर मोहोळ शहरासाठी एक आपुलकीचा, विश्वासू आणि नेहमी सोबत उभा राहणारा कामाचा माणूस आहे असे त्यांच्या गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटपाच्या कार्यातून दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक