बारामतीकरांचा श्वास बनल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार : अजितदादांप्रमाणेच भरला जनता दरबार !!


महाराज्य टाईम्स: (बारामती)  महिलांसह नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय; नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना आदेश. अजित पवारांप्रमाणेच जनता दरबार.          उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील 'सहयोग' या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांनी केला. या दरबारात नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. विशेषतः महिलांच्या समस्या आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेशी संबंधित अडचणी सोडवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.

       सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बारामती तालुक्यातील विविध गावांमधून अनेक नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी आले होते. यामध्ये महिलांची संख्या विशेषतः जास्त होती. 'लाडकी बहीण' योजनेतील अडथळे, स्थानिक नागरी सुविधा, तसेच वैयक्तिक तक्रारी अशा विविध विषयांवर महिलांनी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट संवाद साधला. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे संयमाने ऐकून घेत त्यांनी उपस्थित पशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित पश्र तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या.


या जनता दरबाराच्या वेळी बारामती वकील संघटनेचे सदस्य देखील सुनेत्रा पवार यांना भेटले. त्यांनी वकिलांच्या व्यावसायिक अडचणींबाबत चर्चा केली आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न होत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची ही प्रभावी पद्धत असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक