आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन सोहळा मठांमध्ये भक्तिपुर्ण वातावरणात होतोय साजरा !!


बारामती: (महाराज्य टाईम्स)
    आज श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन आहे. त्यानिमित्त बारामती शहरात अनेक ठिकाणी अत्यंत भक्तिमय व धार्मिक वातावरणात साजरा होत आहे.
    श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी 
(प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले अक्कलकोट जि.सोलापूर येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
    इ.स.१८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. मंगळवेढ्याहुन पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.
   
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष :
महत्त्व: श्री स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानले जाते.
प्रकट दिन २०२६: यावर्षी २० मार्च २०२६ रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जात आहे.
पूजा आणि सेवा: प्रकट दिनी पहाटे स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा पादुकांवर अभिषेक केला जातो, नामस्मरण, 'श्री स्वामी समर्थ' मंत्राचा जप (१०८ वेळा) आणि स्वामी चरित्राचे वाचन केले जाते.
उत्सव: अक्कलकोटसह विविध मठांमध्ये पालखी सोहळे, महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
विशेष संदेश: "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", हा स्वामींचा भक्तांना दिलासा देणारा संदेश या दिवशी विशेष महत्त्वाचा ठरतो .
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविक पहाटे लवकर उठून स्वामींचे पूजन करतात आणि मठात जाऊन दर्शन घेतात.

बारामतीत कोठे कोठे प्रगटदिन साजरा केला जातो:

१) श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र- (दिंडोरी प्रणित)
नाना-नानी पार्क, श्रीरामनगर, शिवाजीनगर, भिगवण रोड, जळोची, बारामती या केंद्रात त्रिकाळ आरती व दैनंदिन नामस्मरण जप उपासना, गुरुचरित्र पारायण व होमहवन असे वर्षभर धार्मिक कार्यक्रम सेवा केली जाते.

२) श्री स्वामी समर्थ मठ -(सिद्धेश्वर गल्ली)
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच जुनी कचेरी मागे, श्री दाते यांच्या श्री गणपती मंदिरा शेजारी, सिद्धेश्वर गल्ली, येथे आहे. या मठात दैनंदिन दोनवेळेस आरती व नामस्मरण केले जाते. तसेच दर गुरूवारी आरती व महाप्रसादाचा लाभ अत्यंत मोठ्या प्रमाणात असंख्य स्वामी भक्त घेत असतात.

३) श्री स्वामी समर्थ मठ:- महावीर पथ
शहरामध्ये गुनवडी चौकाजवळ महावीर पथ येथे श्री राजाभाऊ थोरात यांचा श्री स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. दिवसात दोन वेळा आरती केली जाते. मठात येणारे भक्त दैनंदिन नामस्मरण करतात. मठात श्री दत्त जयंती, प्रगट दिन, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, नवचंडी होम यज्ञासारखे मोठे होम हवन केले जातात असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. विशेष म्हणजे दरवर्षी अक्कलकोटहुन श्री स्वामी समर्थांच्या दिव्य पादुका बारामती शहरात भक्तांना दर्शनासाठी ह्या मठाच्या माध्यमातून आणल्या जातात व हजारो भक्तांना दर्शन व महाप्रसादचे भव्य आयोजन केले जाते.

४) श्री स्वामी समर्थ दरबार:-
शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मारवाड येथे अनेक वर्षांपासून श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. दैनंदिन दोन वेळेस आरती नामस्मरण सेवा भक्तांकडून केली जाते. दर गुरूवारी व  अमावस्या-पोर्णिमा ला मठामध्ये दोनवेळा आरती नामस्मरण जप भजन केले जाते. अनेक भक्त अमावस्या पौर्णिमेला दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात. दर अमावस्या पौर्णिमेला दरबार असतो त्यावेळेस भक्तांच्या विविध वैयक्तिक व आध्यात्मिक प्रश्नांवर व समस्यांवर योग्य मार्गदर्शन व उपाय मठाधिपती श्री स्वामी समर्थ उपासक श्री हरिभाऊ धोंगडे महाराजांकडून सुचवले जातात. अनेक भक्तांनी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने सुचवलेल्या उपायांमुळे समस्या निर्मूलन किंवा प्रश्न मार्गी लागले असल्याचे भक्तांकडुन सांगण्यात येते.

बारामती शहर व पंचक्रोशीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त आहेत. श्री स्वामींना सर्व भक्त आपली माय माऊली मानतात. महाराजांनी सर्वांना "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असा मंत्र देऊन एका आईनी आपल्या लेकराला संकटात आधार देत शक्तीच दिली आहे तसेच श्री स्वामींच्या दर्शनाने अनेक भक्तांना एक विलक्षण अनुभूती दिली आहे अशी दृढ श्रद्धा व विश्वास श्री स्वामींवर असल्याने आज प्रगट दिनाला खुप भक्तिपुर्ण व हर्ष उल्हासाचे वातावरण सगळीकडे दिसून येत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक