शासकिय शिक्क्यांचा गैरवापर प्रकरण: पत्रकाराच्या पाठपुराव्यामुळे डाॅक्टरवर गुन्हा दाखल

महाराज्य टाईम्स: बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा माजी वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर यांनी बनावट शिक्का तयार करून स्वतःच्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमी व्यक्तीला बोगस शासकीय प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा "लोकशाही" न्यूज चॅनेलचे पत्रकार विकास कोकरे यांनी आक्रमकपणे केल्यामुळे अखेर शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बारामतीत विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक नंतर बारामतीत सुद्धा पत्रकारामुळेच गुन्हा उघड झाला:
    सध्या महाराष्ट्रात नाशिक मधील भोंदुबाबा अशोक खरातच्या महिलांवरील अत्याचार व अघोरी कृत्य यामुळे समाजात तिव्र संतापाचे पडसाद उमटले आहेत. खरतर याप्रकराणाला वाचा फोडली ती स्थानिक वर्तमानपत्र "खबरदार पुढारी" यांच्या पत्रकाराने आणि त्यामुळेच खरात प्रकरणाची पाळेमुळे उघड झाली. अगदी त्याच प्रमाणे शासकिय शिक्क्यांचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी उपयोग करुन निरपराध व्यक्तीवर कायदेशीर व न्यायालयीन कारवाई करण्यास व त्यानंतर मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबधित डाॅक्टरवर २०१९ या वर्षांतील गैरकृत्याबद्दल आज तागायत गंभीर प्रकरण असुन सुद्धा गुन्हा दाखल होत नव्हता. परंतू "लोकशाही न्यूज चॅनेलचे पत्रकार विकास कोकरे यांच्या वस्तुनिष्ठ व प्रखर बातम्यांमुळे व त्यांनी वैद्यकीय व पोलिस अधिकारी यांचा आक्रमकपणे व सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सदर प्रकरण ६ वर्षांनंतर पुन्हा प्रकाशझोतात आले व अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

    महाराष्ट्रात विकसित शहर म्हणून नावलौकिक मिळालेले शहर म्हणुन बारामतीकडे पाहिले जाते. पण सध्या स्वच्छ व सुंदर बारामतीवर वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रतिष्ठित डाॅक्टरांमुळे डाग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. स्त्रीबीज तस्करी प्रकरणात शहरातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ व आयव्हिएफ सेंटरचे डाॅक्टर यांची चौकशी करण्यात आली, आणि आता हे जुने ६ वर्षापूर्वीचे प्रकरण तक्रार केली म्हणून बाहेर आले. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारे रुग्णसेवा करत आहेत का? जास्तित जास्त नफा मिळवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी धंदा करत आहेत ? हा मोठा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे.

शासकिय शिक्क्याचा गैरवापर  काय आहे प्रकरण:

डॉ. पांडुरंग संभाजी गावडे (वय ४७, गावडे हॉस्पिटल, गुणवडी रोड, बारामती) असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश गावडे यांनी याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्यानुसार रुग्णालयाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, १ एप्रिल २०१९ रोजी गुणवडी रस्त्यावरील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमीला डॉ. पांडुरंग गावडे यांनी सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर करून बनावट प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्रावर 'Dr. Pandurang Gawade, Medical Officer, SJ Hospital Baramati' असा शासकीय पदाचा शिक्का वापरण्यात आला होता. याबाबत सतीश गावडे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत डॉ. गावडे हे शासकीय सेवेत नसल्याचे स्पष्ट झाले.  
 याबाबत न्यायालयातही खटला   दाखल करण्यात आला होता. या   खटल्यात साक्ष देताना संबंधित सही   व शिक्का स्वतःचाच असल्याचेही     कबूल केल्याचे डॉ. गावडे यांनी       कबूल केले होते. त्यामुळे शासनाच्या   शिक्क्याचा वापर करून संबंधित.   प्रमाणपत्राला अधिकृतता प्राप्त झाल्याचा आभास निर्माण करत दिशाभूल निर्माण केल्याचं डॉ. महेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. डा‌ॅ.जगताप यांनी स्पष्ट केले कि, तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आमची आहे. परंतू गुन्हा करणार्या डाॅ.गावडे यांचा वैद्यकीय परवाना रद्द करणे किंवा उच्चस्तरीय चौकशी करणे त्यांच्यावर कारवाई करायची हा सर्वस्वी अधिकार वरिष्ठ वैद्यकीय कार्यालयाचा आहे.

त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी बाँम्बे नर्सिंग होम नोंदणी नियम १९४९ मधील कलम १३, भारतीय दंड संहिता कलम ४१९ व ४२०, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक