जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

बारामती-मोरगाव रस्त्यावरील जळगाव कडेपठार येथे एका भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असून संबंधित कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ओंकार संतोष खांडेकर आणि रुपेश अमोल खांडेकर या दोन विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर संस्कार संतोष खांडेकर हा विद्यार्थी


गंभीर जखमी झाला आहे. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी हे तिघेही शाळेत निघाले होते. जळगाव कडेपठार गावात बारामती-मोरगाव रस्त्यावर मोरगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या ह्यूंदाई कारने (क्र. एमएच २४ सी ८०४१) या शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली.

या दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनासाठी बंदोबस्तावर असलेल्या राहुल पांढरे, प्रवीण वायसे, विजय वाघमोडे आणि अमोल राऊत या पोलिस कर्मचाऱ्यांनी  तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना स्वत:च्या वाहनातून बारामतीतील खासगी रुग्णालयात नेले. परंतु ओंकार खांडेकर आणि रुपेश खांडेकर या दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर संस्कार खांडेकर याला बारामतीतील गिरीराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे या कारने आणखी एका वाहनालाही धडक दिली आहे. दिनाक 04/09/2023 रोजी सकाळी 09/00 वाचे सुमारास मौजे जळगाव कप ता. बारामती जि.पुणे गावचे हद्दीत इसम नामे सुर्यकांत भिमराव धायगुडे वय 48 वर्षे रा. वनवेमळा बारामती ता.बारामती जि.पुणे सध्या रा. मांजरी ता.हवेली जि.पुणे याने त्याचे ताब्यातील आय टेन फोरव्हीलर गाडी नंबर एम. एच. 24 सी 8041 हि मोरगाव बाजुकडुन बारामती बाजुकडे ड्रायव्हीग करत मोबाईल वरती व्हीडीओ गाणी बघत गाडी भरधाव वेगात चालवुन आपल्या मोबाईलमध्ये व्हीडीओ गाणी बघत ड्रायव्हीग करत असताना अपघात होवुन एखादयाचा जिव जावु शकतो याची कल्पना असताना देखील गाडी चालविताना मोबाईलमध्ये व्हीडीओ गाणी बघत गाडी भरधाव वेगात चालवुन रस्त्याच्या साइडपट्टीवरून जाणारे ओमकार संतोष खांडेकर वय 16 वर्षे , व संस्कार संतोष खांडेकर वय 13 वर्षे, रूपेष अमोल खांडेकर वय 15 वर्षे सर्व रा. जळगाव कप ता. बारामती जि.पुणे या शाळकरी मुलाना उडवुन देवुन त्यातील ओमकार संतोष खांडेकर वय 16 वर्षे व रूपेश अमोल खांडेकर वय 15 वर्षे याचे मृत्युस व संस्कार संतोष खांडेकर वय 13 वर्षे याचे गंभीर दुखापतीस तसेच अतुल भिलारे याचे कारचे नुकसाणीस कारणीभुत झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित चालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक