तब्बल २६ वर्षांची दहिहंडी परंपरा...युनिटी फ्रेंडस सोशल क्लबची दहीहंडी योगेश जगताप संघाने फोडली.


बारामती (दि. १०) : मा. नगरसेवक निलेश आप्पा इंगुले यांच्या युनिटी फ्रेंडस सोशल क्लबच्या वतीने मागील २६ वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. बारामती शहरात सर्वात जुनी दहीहंडी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 
शहरात सुभाष चौक येथे यावर्षीही अत्यंत जोशपुर्ण वातावरण दिसून आले. निलेश इंगुले यांच्या संघटन कौशल्यामुळे हजारो तरुणांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात दहिहंडी पाहण्यासाठी दिसुन आली. डिजे संगिताच्या तालावर तरुणाई अक्षरशः थिरकत होती. दहीहंडी फोडण्यासाठी ५ संघानी प्रयत्न केला होता. त्यामध्ये मुंबई येथील महिला संघाने सुद्धा प्रयत्न केला होता. सुरक्षिततेच्या कारणामुळे दहिहंडीची उंची २५- ३० फुटापर्यंतच ठेवण्यात आली होती त्यामुळे सर्वच संघ दहीहंडी फोडण्यासाठी तयार होते. सगळ्यांच्या नावाची चिठ्ठी टाकून त्यामधून योगेश जगताप दहीहंडी संघाला संधी देण्यात आली. ५ थर लावून पहिल्याच प्रयत्नात दहिहंडी फोडण्याचा मान पटकवला. रु. २१०००/- रोख व ट्राॅफी असा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती आयोजक निलेश इंगुले यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना दिली.

दहीहंडीचा उत्सव पार पाडण्यासाठी अक्षय इंगुले, चेतन इंगुले, सनी नागे, बाळा इंगुले, रवि करळे, दिपक शाहिर, सोमनाथ धनराळे, अमित पलंगे, अल्ताफ शेख, जमीर शेख, फारुख सय्यद, ऋषिकेश इंगवले, राजेश काळे, राजेंद्र कांबळे, शुभम बिंद्रे, यश घोणे, सोहम वाडेकर, ओम इंगुले, सोनू बेंद्रे, रोहित गायकवाड, रोहित पलंगे, सागर खलाटे व इतर कार्यकर्त्यांनी  विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक