शिवशंभोन पटकावला मोहोळची दहीहांड़ी फोडण्याचा मान


मोहोळ: (प्रभाकर बावधनकर)
मोहोळ शहर मध्यवर्ती दहीहंडी उत्सव समिती व मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी सोहळ्यामध्ये बारामतीच्या शिवशंभो गोविंदा पथक या संघाने दहीहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयाचे पारितोषिक व चषक पटकावले.
तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बारामतीच्या भैरवनाथ संघाने पटकावले त्या संघाला 77 हजार 777 रुपये व चषक देण्यात आला. या स्पर्धेमध्ये मुंबई येथील साईलीला महिलांचा गोविंदा संघ ही सहभागी झाला होता. त्या संघाला 55 हजार 555 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या शुभहस्ते विजेत्या संघला पारितोषक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या वतीने मोहोळ नगरपरिषद कार्यालय समोर या भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
*या सोहळ्याला मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थितीना गोविंदा पथक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व रमेश बारसकर यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले*.सदर दहीहंडीमध्ये डि जे,लेझर लाईट शो,फायर फाटका,भव्य स्टेज आदीमुळे कार्यक्रमाची भव्यता दिसून येत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूरच्या सुप्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले व ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर यांनी केले.
हा दहीहंडी उत्सव सोहळा पाहण्यासाठी मोहोळ शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून युवक व महिला भगिनी अबालवृद्धांनी अफाट स्वरूपाची गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक