उत्कृष्ट दहिहंडी उत्सवाचे प्रथम पारितोषिक स्व.धनंजयभाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्टला प्रदान
बारामती: १६ सप्टेंबर :. बारामती शहरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाल्यानंतर पोलीस व प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या. दहीहंडी उत्सव २०२३ शिस्तबद्ध व उत्कृष्टरित्या दहीहंडी उत्सव साजरा केलेल्या मंडळांपैकी प्रथम क्रमांक मिळवलेल्या धनंजय (भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्ट यांना शांतता कमिटीच्या मीटिंग वेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच सन्मानपत्र देऊन अध्यक्ष व आयोजक मा. नगरसेवक जयसिंग (बबलू) देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. दरवर्षी देशमुख यांच्या दहीहंडीचा उत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो. बारामतीत या दहिहंडीचे आकर्षण व उत्सुकता असते. त्यामुळे देशमुख यांच्या दहिहंडीला हजारो नागरिक दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी शेवटपर्यंत थांबलेले असतात.
याच प्रमाणे बारामती दहीहंडी उत्सव 2023 यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. व सन्मानपत्र हे युनिटी फ्रेंड्स क्लब सुभाष चौक. आयोजक मा. नगरसेवक निलेश (आप्पा) इंगुले यांना देण्यात आले. त्याच प्रमाणे इथून पुढच्या काळात देखील. शिस्तबद्ध व उत्कृष्टरित्या उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल
तसेच बारामती शहरातील गणेश उत्सव साजरा करणारी मंडळे यांना देखील पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बारामती शहरांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने व उत्कृष्टरित्या. मंडळाकडून घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षितेच्या बाबतीत मंडळांकडून घेण्यात येणारी काळजी हि योग्य पद्धतीने. आयोजकांकडून पार पाडण्यात येते व इथून पुढे देखील शिस्तबद्ध पद्धतीने व उत्कृष्टरित्या पार पाडण्यात येणार असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे त्याचप्रमाणे उपस्थित बारामतीतील सर्वच गणेश मंडळे तसेच दहीहंडी उत्सव मंडळे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा