गवत्या मारुती तरुण मंडळाच्या श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नसीर मोमीन यांची निवड
*मोहोळ: ( प्रभाकर बावधनकर ): शहरांतील सर्व धर्म सम भावाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आणि नामांकित ओळख असलेल्या गवत्या मारुती तरुण मंडळाच्या श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव वर्ष 55 वे मंडळाच्या उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नसीर मोमीन यांची निवड करण्यात आली ह्या निमित्त सत्कार प्रसंगी दाखविलेला विश्वासार्हता सार्थ ठरविणार असल्याचे मनोगत नसीर मोमीन यांनी व्यक्त केले.*
मोहोळ शहरातील रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने नसीर मोमीन यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रंगभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल महामुनी, लोकशक्ती परिवाराचे दिलीप गायकवाड, मा पंचायत समिती सदस्य दमानी गोडसे, दिलीप शिंदे, बापूराव राऊत, रंगभूमी प्रतिष्ठानचे तथा सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजन घाडगे आदि. उपस्थित होते.
श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षपदी नसीर मोमीन यांची निवड झाल्याबद्दल रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यंदा पर्जन्यमान कमी आहे व दुष्काळाच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत ही परिस्थिती अशी राहिल्यास सामाजिक उपक्रमाद्वारे व्यक्तिगत मदत कार्य करणार असल्याचे नसीर मोमीन यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा