गणेश उत्सवासाठी पोलिस व नगर परिषद प्रशासन सज्ज ! बारामतीतील मंडळांना प्रत्यक्ष भेटुन घेतला आढावा

(सुभाष चौक येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रशासन अधिकारी मार्गदर्शन करताना) 
बारामती (महाराज्य टाईम्स्): बारामती शहरात गणेशोत्सवानिमित्त प्रचंड उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण झाले. अनेक गणेश मंडळ सज्ज झालेत. बाजारपेठत सुद्धा खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांची नागरिकांच्या सोईसाठी व सुविधांसाठी जबाबदारी वाढली आहे.
   शहरात अनेक गणेश मंडळ विविध डेकोरेशन व देखावे करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी आकर्षक मंडप तयार केले आहेत. सदर मडळांना नगर परिषदचे मुख्याधीकारी महेश रोकडे, पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुनिल धुमाळ व इतर अधिकारी यांनी दिवसभर समक्ष भेटी देऊन आढावा घेतला. वाहतुकीला अडचणी येऊ नये म्हणून मंडळाना मंडप योग्य पद्धतीने उभे करण्यास सांगण्यात आले. काही ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत प्रमुख मार्गावरील मंडळाच्या बाबतीत अडचणी आल्या होत्या पण प्रशासन व मंडळांच्यां कार्यकर्त्यांनी समझोता दाखवून सहकार्य करण्याची शाश्वती दिली.
    कुठलाही उत्सव असला कि, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला कसरत करावी लागते. त्यासाठी त्यांना मुबलक कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध ठेवावेच लागते. त्यासाठी बारामती शहर पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामध्ये पोलिस निरिक्षक - १, अधिकारी- ८, अंमलदार - ६०, होमगार्ड- २० व एसआरपी प्लॅटून असा कर्मचारी ताफा १० दिवस गणेशोत्सवच्या व्यवस्थेसाठी कार्यरत ठेवण्यात आला आहे. 
   दोन दिवसापूर्वी बारामती शहरात सर्व पोलिस ताफ्याचे संचलन पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या सोबत करण्यात आले होते. 
     (बारामती शहरातुन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथ संचलन)
  
"बारामती शहरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, सुरक्षित व  शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेकडुन सर्व नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आम्ही कायम उपलब्ध असणार आहोत."
दिनेश तायडे- पोलिस निरिक्षक, बारामती शहर

"उत्सवाच्या काळात शहरामध्ये रस्त्यावर गर्दीचे स्वरूप असते त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीत बारामती नगर पलिका प्रशासन कायम तत्पर असते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग व कर्मचारी उत्तम काम करत आहेत.
राजेंद्र सोनवणे- आरोग्य निरिक्षक, बारामती नगर परिषद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक