राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार
" जुन्या मीटरच्या जागी आता नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून, थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा आपोआप खंडित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. "
बारामती: (महाराज्य टाईम्स) महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. यासाठी एकूण 26 हजार 921 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज सहा निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे येथील मीटर अदानी ग्रुप कंपनी बदलणार आहेत.
RDSS योजनेंतर्गत DBFOOT तत्त्वावर महाराष्ट्र राज्यातील MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा पुरवठादाराची नियुक्ती आज करण्यात आली. उर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारत सरकार आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड निर्देशानुसार काम करतील. महाराष्ट्र राज्यातील MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी Advanced Metering Infrastructure (AMI) सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी सात निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी सहा निविदा अंतिम झाल्या आहेत.
स्मार्ट मीटर म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company) राज्यभर स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या तयारीत आहे. वेळेवर बिल न भरणाऱ्यांसाठी स्वयंचलित वीज खंडित करण्याची सुविधा असेल. स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत प्रत्येकी 2600 रुपये आहे. हे मोबाइल फोनप्रमाणे ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.
कोणते स्मार्ट मीटर बसवायचे याचा पर्याय ग्राहकांना द्यावा, अशी सूचना महावितरणने केली आहे. कंपनीने यापूर्वीच स्मार्ट प्रीपेड मीटर योजना सुरू केली आहे, जी पुरेशा ग्राहकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली आहे. केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22.8 दशलक्ष स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी करत आहे.
मीटर चा खर्च कोण करणार? महावितरण कि ग्राहक? जर ग्राहक करणार असेल तर हा विनाकारण चा बोजा ग्राहकाच्या माथी बसणार आहे. जर ग्राहकाकडून हा खर्च वसूल केला जाणार असेल तर स्मार्ट मीटर बसवून
उत्तर द्याहटवाघेणाऱ्या ग्राहकांना बिलात सूट द्यावी.
बिलात सूट दयावी
उत्तर द्याहटवाया पुर्वीच्या मिटर साठी आम्ही पैसे भरलेले असताना आमचे मिटर आपण घेऊन जाता त्याबदल्यात हे नवीन मिटर बसवण्यात यावे पैसे भरावे लागतात तर हा नवीन बोजा ग्राहकांवर कशासाठी लादला जात आहे यात रेगूलर ग्राहकांची काय चूक आहे नवीन मिटरचा बोजा ज्यांना कमाई करायची आहे त्यांनी सहन करावा विनाकारण ग्राहकांना त्रास दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी हा बोजा ग्राहकांवर लादला गेला तर "चूप नहीं तो कान काटुंगा"अशी ग्राहकांची गत होणार हे निश्चित आहे ग्राहक पुर्वीच्या महागाईत होरपळून निघत आहे त्यात आणखीन ही भर टाकू नये असे मला वाटते या वर सर्व वृत्तवाहिन्या सरकार एम एस ई डीसीएल यांनी एकत्रीत विचार करून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे बस आम्ही सर्वजण कितीही कौतुक केले काय आणि विरोध केला काय आपल्या फायद्यासाठी मनात जसे ठरवले आहे हे तसेच सत्यात उतरणार आहे हे सत्य तितकेच खरे आहे धन्यवाद हे
हटवा