गणेशोत्सवात बारामतीकरांनी अवश्य बघावा असा एकमेव हलता देखावा- " ज्वालासुराचा वध"
बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौक तरुण मंडळाने तब्बल ३५ वर्षाची परंपरा जपत अखंडपणे विविध विषयावरील, धार्मिक प्रसंगावर आधारित हलते देखावे सादर करत आहेत. लाखों रुपये खर्च करुन सजीव वाटणार्या विविध पात्रांच्या मूर्ती तयार करुन आधुनिक पद्धतीने त्यांना हलते बोलते करुन अनेक विषय देखाव्यांच्या माध्यमातून लोकांसमोर एक प्रसंग लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न गेल्या ३५ वर्षापासुन अखंडपणे केला जात आहे. सध्या बारामती शहरात एकमेव असे गणेश मंडळ असुन ज्यांनी कुठलाही डिजे, साऊंडच्या भिंती उभा न करता एक पारंपारिक गणेशोत्सव साजरा करत आहेत.
यावर्षी पौराणिक कथेतील प्रसिध्द ज्वालासुर राक्षसाचा भगवान शंकराने केलेल्या वधाचा देखावा खरोखरीच अत्यंत भव्य व देखणा असाच साकारण्यात आला आहे. सदर देखाव्यातील ज्वालासुराचे रुप खरोखरच खुप रौद्रस्वरूपात आहे. संपुर्ण कुटुंबाने आवर्जुन न चुकता मारवाड पेठ येथे मुलाबाळांना दाखवण्यासाठी जावुन अनोखा देखावा पहावा.
करमुणीकीची सध्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत पण असे देखावे सादर करणारे मंडळे आर्थिक अडचणींमुळे पुढे येत नाहीत. महात्मा गांधी चौक तरुण मंडळाचा देखाव्यासाठी मंडळाच्या सभासदांनी खुप कष्ट घेतल्याचे दिसुन येत आहे.
तरी अवश्य पहावा असा "ज्वालासुराचा वध" हलता देखावा
मंडळाचे अध्यक्ष- वैभव वनारसे, उपाध्यक्ष- सागर मोदी, कार्याध्यक्ष- सोमेश कल्याणकर, खचिनदार- दिपक वाडेकर, सचिव- विराज वनारसे, सह खजिनदार- राहूल पोरे, सहकार्याध्यक्ष- चिन्मय कुलकर्णी, सह सचिव- ओम धोंगडे
व सभासदांनी सदर देखावा सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा