भव्य थाटामाटात गणेश विसर्जन मिरवणुक सुरू
महाराज्य टाईम्स: बारामती शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधुम अत्यंत थाटामाटात सुरू असुन प्रचंड उत्साही वातावरणात गणेशाला दहा दिवसाच्या मुक्कामानंतर निरोप देण्यात आहे.
अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचा श्रीमंत आबा गणपतीची मिरवणूक नेहमी प्रमाणे अत्यंत थाटामाटात दुपारी २ वाजतां सुरू झाली ती पण अत्यंत दिमाखदार सुशोभित केलेला रथ व त्यावर भव्य श्रीमंत आबा गणपती मूर्ती अत्यंत दिमाखदार दिसत होती.
मिरवणुकीत जयोस्तुते, म.ए.सो.शाळेचे मुलींचे दुर्गावंदन, जनहित शाळेचे जनहित असे तीन ढोल पथक गणराया चरणी आपली सेवा देत होते. घोडे, उंट, व अनेक विविध रंगभुषा केलेले कलाकार मिरवणुकीत सहभागी झाले होते. बारामतीत सर्वात भव्य मिरवणुकीचा मान याच मंडळाला जातो.
मिरवणूक अत्यंत उत्साहात चालु असताना अचानक संध्याकाळी ७ च्या दरम्यान पाऊसाने जोरदार प्रमाणात हजेरी लावले. सर्व मडळाची तारांबळ उडाली परंतू उत्साह कमी झाला नाही. जोरदार पाऊसात सुद्धा तिन्ही ढोल पथकांनी अखंडपणे ढोल तासाचा नाद कायम ठेवला.
मिरवणूक गुनवडी चौकात आली असताना पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये थोडावेळ एका ढोल पथकाला वाजवु न देण्याच्या व पुढे चला या विषयावर चमकम झाल्याचे दिसून आले. सहा महिने सराव करुन लाखो रुपये खर्च करून जर वर्षातून एकदा मनसोक्तपणे वाजवून दिले नाही तर वादक व कार्यकर्ते नाराज होतात अशी परिस्थिती तयार होते. तसेच काहीसे घडले परंतू मिरवणूक पुन्हा ढोलताशांच्या गजरात पुढे सरकलो.
श्रीमंत आबा गणपतीची मिरवणूक अत्यंत बघण्यासारखी दिमाखदार होती अशी नागरिकांनी महाराज टाईम्स शी बोलताना प्रतिक्रिया दिली.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा