सच्चा कार्यकर्त्याच्या भावनेची केली कदर....उपमुख्यमंत्रि अजितदादा सात्वन करायला खुडेच्या घरी हजर...
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील अजित पवार यांचा एक कट्टर कार्यकर्ता सतीश खुडे यांच्या मातुः श्री कमल तुकाराम खुडे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्याच्या सांत्वनासाठी आज (ता. 8) अजित पवार यांनी आमराईतील त्याचे घर गाठले. त्याच्या घरी सतरंजीवर ते मांडी घालून बसले व कुटुंबियांचे सांत्वन केले.
कितीही मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तरी जिवाभावाच्या कार्यकर्त्याला अंतर द्यायचे नाही, हे तत्त्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही कायम ठेवलेले असल्यानेच त्यांच्या निवडणूकीत कार्यकर्ते जिवाचे रान करतात.
वयाच्या सतराव्या वर्षापासून सतीश खुडे अजित पवार यांच्या निवडणूकीत प्रचाराला निस्वार्थीपणे कायम पुढे असतात. अजित पवार आमदार होण्याअगोदर पासूनच काँग्रेसची सत्ता असतानाच सतिश खुडे आदरणिय पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत होता. अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सतिश खुडे अजित पवार जिथे जातील तिथे अगोदर पोहचणार. अजित पवारांच्या प्रेमापोटी त्या काळात त्यांच्या नावाने एका गणेशोत्सव मंडळाचीही त्यांनी स्थापना केली होती. प्रत्येक निवडणूकीत पवार कुटुंबियांच्या प्रचारासाठी सतीश खुडे कायमच स्वताःला वाहून घेतो. सतिश खुडे यांनी आजतागायत पक्ष नेतृत्वाकडे कधी कुठल्या पदाची स्वताहुन मागणी केली नाही. परंतू आज तागातयत खुडेंना कुठल्याच पदावर पक्षाने संधी दिली नाही.
एखाद्या इमारतीच्या पाया भक्कम करण्यासाठी मजबुत दगड पायात रचले जातात तसाच पायातला दगड म्हणजे खुडे सारखे अनेक कार्यकर्ते अजून काम करत आहेत.
सतिश खुडेंच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी कळाल्यावर अजित पवार यांनी त्यांच्या घरी जात त्यांचे सांत्वन केले. कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करत काही मदत लागल्यास जरुर सांगा असे सांगण्यासही ते विसरले नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी सांत्वनासाठी येणे हीच माझ्या कामाची पावती असल्याचे सतीश खुडे यांनी नंतर सांगितले. खुडे यांच्या मुलासह कुटुंबियांचीही पवार यांनी चौकशी करत त्यांना धीर दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा