दहीहंडी उत्सव दूर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना शासन देणार विमा संरक्षण


ठाणे, (दि. 07) ,गुरुवार:- दहीहंडी उत्सव / प्रो-गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात/दूर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यानुषंगाने गोविंदाना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 50 हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु.75/- चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.37 लाख 50 हजार  इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती (महा) या संस्थेस वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील :- अपघाती मृत्यू विमा संरक्षण - रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास विमा संरक्षण - रु.१०,००,०००(रु. दहा लक्ष), एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास विमा संरक्षण - रु.५,००,०००(रु. पाच लक्ष), कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व (Permanent total disablement) विमा संरक्षण - रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व (Permanent partial disablement) विमा संरक्षण - विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारी नुसार. अपघातामुळे रुग्णालयीन खर्च विमा संरक्षण - प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (एक लक्ष).

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी जारी केला असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 202308181630295321 या क्रमांकाने उपलब्ध करुन दिला आहे.   

विमा संरक्षणाचा कालावधी हा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी  6.00 वाजेपर्यंत राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक