पावसामुळे मोहोळ शहरात चिखलमय रस्ते, खड्डयात साचले पाणी ! मात्र पावसाच्या आगमनाने शेतकरी झाले समाधानी !!
मोहोळ: (प्रभाकर बावधनकर) मोहोळ शहर परिसरात शनिवारी रात्री व रविवार रोजी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने या पावसामुळे शेतकरी बांधवांसाठी व त्यांच्या खरीप पिकांसाठी जीवदान मिळाले आहे. या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने सकल भागात पाणी साचले असल्याचे चित्र पहावयास मिळाले व हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. पाण्याची पातळी वाढावी एवढा पाऊस पडला नाही. शेतकरी बांधवांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
पडत असलेला पाऊस हा प्रदीर्घ कालावधीनंतर काल शनिवारी व रविवारी दुपारी मध्यम व हलक्या पावसाने हजेरी लावली व या मध्यम व हलक्या सरीने पाऊस पडला. पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके हे करपून चालली होती. हवामानात उकाडा जाणवत होता आणि उन्हाळ्यासारखे चटके अंगाला जाणवत होते. यामुळे हवामानात गारवा निर्माण होऊन पिकांना सध्या तरी जीवदान मिळाले आहे.
मोहोळ शहरात पावसाची सुरुवात झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी पावसावर आपली प्रतिक्रिया दिले आहे मोहोळ नगरपरिषदेने केलेले रस्ते त्यामध्ये खड्डे पाणी साचले आहे या मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने रस्त्यावर व उपस्त्यावर खड्डे व चिखलमय परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया मोहोळ नगरपरिषदेच्या कामकाजाविषयी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केले आहे. मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे खरीप हंगाम पिकांना जीवदान मिळाले आहे आत्ता मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा