वन मॅन शो गणेशोत्साव तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी प्रिती मुन्ना टेळे यांची तर उपाध्यक्षपदी येसूबी गब्बर मुलाणी व रूपा प्रशांत पलंगे यांची निवड

मोहोळ: (प्रभाकर बावधनकर) मोहोळ शहरातील प्रतिष्ठेचे समजले जाणारे वन मॅन शो गणेशोत्सव तरुण मंडळ 2023-24 ची कार्यकारणी आज घोषित करण्यात आली. शहरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर या ठिकाणी मंडळाची वार्षिक आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये गणेशोउत्सव काळामध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमाविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली.यंदा वन मॅन शो गणेशोत्सव तरूण मंडळाच्या सर्व कार्यकारणी पदी महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.या वार्षिक आढावा बैठकी प्रसंगी मंडळाचे संस्थापक रमेश बारसकर बोलताना म्हणाले की आज घडीला या देशांमध्ये जगामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही महिला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित आहेत ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी महिलांना वन मॅन शो गणेशोत्सव तरुण मंडळाच्या कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आले असल्याचे सांगितले.

यामध्ये मंडळाचे माजी अध्यक्ष कै.मुन्ना नागनाथ टेळे यांच्या पत्नी श्रीमती प्रीती मुन्ना टेळे यांची तर उपाध्यक्ष म्हणून येसूबी गब्बर मुलाणी व रूपा प्रशांत पलंगे कार्याध्यक्ष स्वाती सादिगले व नंदाताई गोरे सचिव गायत्री ढाणके,मदिना शेख व सुजाता सादिगले खजिनदार दीपा भालेराव,अश्विनी जाधव कार्यक्रम प्रमुख स्नेहल क्षिरसागर,नीलम अष्टुळ सदस्य अश्विनी एकमल्ले,अनिताताई बळवंतकर,अमृता महामुनी, सलीमा शेख,पुनम कांबळे, संगीता राऊत,वंदना घोडके कोयल माळी,आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक