बारामती गणेश फेस्टिवल मध्ये बहरदार कार्यक्रमांची बारामतीकरांना मेजवाणी

मा.ना. अजितदादा पवार यांनी २००२ मध्ये बारामती गणेश फेस्टिव्हलची सुरुवात केली यावर्षी फेस्टिव्हलचे (कोविड वर्ष वगळता) सलग २१ वे वर्ष आहे. या वर्षीचा गणेशोत्सव दि १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. मा. ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे दि २३ सप्टेंबर रोजी सपत्नीक फेस्टिव्हलला उपस्थित रहाणार आहेत.

बारामती गणेश फेस्टिव्हलच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना मंगळवार दि १९ रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी श्री वैभव नावडकर यांच्या हस्ते होणार आहे. 
बारामती गणेश फेस्टिवलमध्ये बारामतीकरांना करमणुकीच्या कार्यक्रमांची दरवर्षी मेजवाणी मिळत असते.
कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे :-
*दि. १९ रोजी सायंकाळी ७ वाजता भिमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांच्या "माझे माहेर पंढरी" हा भजन - भक्तीगीतांचा कार्यक्रम.

दि २० रोजी प्रसिध्द समाजप्रबोधन कीर्तनकार ह. भ. प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन.

दि २१ स्वरनिनाद प्रस्तुत ऑर्केस्ट्रा "सत्यम शिवम सुंदरम 
दि २२ पूनम कुडाळकर यांचा मराठी लावणी नृत्याचा कार्यक्रम "या रावजी बसा भावजी" 
दि २३ मराठी नाटक करून गेलो गाव" या मध्ये अभिनेते भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या भूमिका आहेत. 
रविवार दि २४ रोजी महिला वर्गाच्या मागणी नुसार महिलांकरिता स्वतंत्र लावण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन दुपारी ४ वाजता "आहो नादाच खुळा आयोजित करण् काथा सुरेगावकर आलेला आहे व हाच कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता सर्वांकरीताही खुला आहे. 
या कार्यक्रमात संगीता लाखे, प्राची मुंबईकर, अर्चना जावळेकर, नमिता पाटील हे लावणी नृत्य सादर करणार आहेत. 
दि २५ "प्यार महोब्बत और हसरते" हा हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा
दि २६ रोजी "रेट्रो ते मेट्रो" हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा 
दि २७ रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक कलावंतांचा "कन्ऱ्हेचे कलावंत कार्यक्रम व संध्याकाळी ७ वाजता आमदार अमोल मिटकरी यांचे “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज" या विषयावर व्याख्यान 
दि २८ रोजी सकाळी १० वाजता पालखी मधून विसर्जन मिरवणूक होणार आहे. 
वरिल सर्व कार्यक्रम नटराज नाट्य मंदिर तिन हत्ती चौक येथे होणार असून सर्व नागरिक बंधू भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक किरण गुजर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक