मराठवाड्यातील मराठा-कुणबी आंदोलनला मिळाले यश. महाराष्ट्र शासनाकडुन आरक्षणचा जीआर (शासन निर्णय) जाहीर! !
मुंबईः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून जालन्याच्या अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काल घोषणा केली होती. आज अखेर सरकारने यासंदर्भात शासन आदेश काढलेला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. काल मुख्यमंत्र्यांनी निजामकालीन पुरावे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असं आश्वासन दिलं होतं.
निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करुन कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचा जीआर काढण्यात आलेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा